पुणे: मराठा समाजाची आरक्षणाची मागणी ही पूर्वीची आहे. जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे या मागणीला धार मिळालेली आहे. मराठा समाजाची मागणी लवकरात लवकर राज्य आणि केंद्र सरकारने पूर्ण करावी, मराठा समाजाच्या तरुणांचा सरकारने अंत पाहू नये असा घनघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. दानवे यांना मराठा समाजाच्या संघटनांनी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला, यावर बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाच्या आरक्षणाला माझा विरोध नाही. मी देखील त्या आंदोलनातील एक कार्यकर्ता आहे, असं म्हटलं आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा-परीक्षा शुल्क कमी करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचा हिवाळी अधिवेशनावर दणका मोर्चा

अंबादास दानवे म्हणाले, माझा विरोध झालेला नाही, मी ही त्या आंदोलनातील एक कार्यकर्ता आहे. मी त्यांना भेटण्याच्या तयारीत होतो. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबद्दल भूमिका मांडलेली आहे. मी मराठवाडा येथील आहे. जरांगे पाटलांच्या नेहमीच संपर्कात असतो. आंदोलक आक्रमक आहेत, त्यांच्याशी चर्चा करायला हवी होती. मराठा आरक्षणाची मागणी ही जुनी आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे या आंदोलनाला, मागणीला धार आली आहे. मराठा समाजाच्या तरुणांचा सरकारने अंत पाहू नये. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. आरक्षणाची ५० टक्के मर्यादा वाढवली तर आरक्षण मिळू शकत. राज्य आणि केंद्रसरकार या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. कृषी विषयी नऊ वर्षात पंतप्रधानांनी काय केले हे उत्तर त्यांनी द्यायला हवं.