लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सर्वात मोठा मतदारसंघ असलेल्या चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये मतदान केंद्र स्तरावरील अधिकारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. पाच लाख ७९ हजार मतदारांपैकी आतापर्यंत तीन लाख ६५ हजार मतदारांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सर्वेक्षणात स्थलांतरित, मयत झालेल्या मतदारांची माहिती घेण्यात येत असून संबंधितांची नावे वगळण्यात येणार आहेत.

sambhajinagar sarees sale
विधानसभा निवडणुकीपूर्वी साड्यांच्या विक्रीत २० टक्क्यांची वाढ, लाडकी बहीण व घाऊक साडी वाटपामुळे विक्री तेजीत
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Resurvey, Mahayuti, Vadgaon Sheri,
वडगाव शेरीचा उमेदवार निश्चितीसाठी महायुतीचे पुन्हा सर्वेक्षण; इच्छुकांमध्ये धाकधूक
disciplined party bjp is on the verge of indiscipline
बेशिस्तीच्या वळणावर ‘शिस्तबद्ध’ पक्ष
Embarrassment in Mahavikas Aghadi from Akola East Constituency Assembly Elections 2024 print politics news
अकोला पूर्ववरून महाविकास आघाडीत पेच
Dr Sachin Bodhani demanded 30 assembly seats for Brahmin community from Fadnavis
भाजपने ब्राह्मण समाजाला गृहीत धरू नये, महाराष्ट्र ब्राह्मण सभेचा इशारा; विधानसभेसाठी ‘इतक्या’ जागांची मागणी
Palghar, Palghar politics, political party Palghar,
पालघर जिल्ह्यात पक्षांतर केलेल्यांचा जीव टांगणीला
Mumbai University Senate Election,
मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक : ५१६ मते अवैध; खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना १,११४ मतांचा कोटा

मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण, प्रमाणिकरण, दुबार, समान नोंदी, एका पेक्षा अधिक नोंदी, त्रुटी दूर करणे, आयोगाच्या मानंकानुसार छायाचित्र प्राप्त करुन मतदार यादीत सुधारणा, विभाग अथवा भाग यांची आवश्यकतेनुसार सुधारणा आणि मतदान केंद्रांच्या सीमांच्यापुनर्रचना करण्यासाठी कालबद्ध योजना आखण्यात आली आहे. चिंचवड मतदारसंघामध्ये त्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. चिंचवडमध्ये ५१० मतदान केंद्र आहेत. तसेच काही मतदान केंद्र ही पहिल्या मजल्यावर आहेत. ही केंद्र तळ मजल्यावर घेण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. त्यामुळे मतदान केंद्रांची पुनर्रचना करण्यात येणार आहे. यासाठी विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्यात येणार आहे.

हेही वाचा… जालन्यातील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये कडकडीत बंद

चिंचवड, पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना मतदार यादीत नवीन नाव समाविष्ट करणे, नावामध्ये दुरुस्ती करणे आणि आधार कार्ड जोडणे यासाठी दहा लाख संदेश (एसएमएस) पाठविण्यात आले आहेत. नागरिकांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या व्होटर हेल्पलाइनचा वापर करून मतदान यादी शुद्धिकरण, अद्ययावतीकरणास सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी अमोल कदम यांनी केले आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघ राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा मतदार संघ आहे. मतदार सर्वेक्षणाचे काम सुरू असून तीन लाख ६५ हजार मतदारांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. – नीलेश देशमुख, मतदार नोंदणी अधिकारी