तब्बल २० वर्षांनंतर डबलडेकर बस पुण्यात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) ही वाहने सोडण्याचा विचार करत आहे, परंतु याबद्दलची चर्चा प्राथमिक टप्प्यात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

PMPML ने सांगितले की, “गेल्या महिन्यात एका कंपनीच्या प्रतिनिधींनी येथील वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केली. अधिकार्‍यांनी इलेक्ट्रिक डबल-डेकर बसेसबद्दल विचारले आणि ही सेवा का बंद करण्यात आली हे जाणून घ्यायचे होते. याबाबत आणखी चर्चा होणार आहेत.”

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, पीएमपीएमएलच्या सहव्यवस्थापकीय संचालिका चेतना केकुरे यांनी सांगितले की, अधिकारी नवीन वाहने घेण्याचा विचार करत आहेत. या बसेस नेहमीच्या बसपेक्षा जास्त आसनक्षमता देतात. बहुतांश बस या इलेक्ट्रिक असल्याने पर्यावरणाचे कमी नुकसान होणार आहे.

पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “मुख्यमंत्र्यांना या प्रकल्पात विशेष रस आहे, त्यामुळे पीएमपीएमएल देखील यावर गांभीर्याने विचार करत आहे. परंतु डबल डेकर बस चालवणे सोपे नाही. मार्गांसह अनेक गोष्टी निश्चित करणे आवश्यक आहे.”

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Double decker buses to soon ply on pune roads vsk