पुणे : राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले राहिले आहे. कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्याचा परिसर वगळात राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. तळकोकणात जून महिन्यात पाऊस न झाल्यामुळे भात लागवडीचे वेळापत्रक सुमारे पंधरा दिवसांनी पुढे गेले. रत्नागिरीत जेमतेम दोन टक्के लावणी झाली आहे. जूनअखेरीस झालेल्या पावसामुळे रत्नागिरीसह किनारपट्टीवरील जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट टळले आहे.

कोल्हापूर परिसरात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पाण्याअभावी पिके वाळू लागली आहेत. धोक्यात आलेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे केली. भात, सोयाबिन, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आले आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुका वगळता जिल्ह्यात अद्याप पाऊसच सुरू झालेला नाही. केवळ चार टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यातही सर्वाधिक क्षेत्र शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील भात पिकाचे आहे. जूनमध्ये पावसाची सरासरी १२९ मिमी असताना केवळ ३६ मिमी पाऊस पडला. कडधान्य, सोयाबिनसारख्या नगदी पिकाच्या पेरणीचा काल उलटून गेला आहे.

Traders reported that price of coriander decreased compared to last week and price of fenugreek is on rise
कोथिंबिरेच्या दरात घट; मेथी तेजीत, फळभाज्यांचे दर स्थिर
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष
Assembly Election 2024 Malegaon Outer Constituency Dada Bhuse print politics news
लक्षवेधी लढत: मालेगाव बाह्य : मंत्री दादा भुसे यांचा मार्ग यंदा खडतर

 साताऱ्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार कायम असून, महाबळेश्वर येथे आजपर्यंत एक हजार मिमी पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणातही साठा वाढून १५.४४ टीएमसीपर्यंत पोहोचला आहे. जिल्ह्याच्या अन्य भागात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. सोलापुरात खरीप हंगाम वाया जाण्याची भीती आहे. जून महिन्यात जिल्ह्यात जेमतेम २८ मिमी पाऊस झाला आहे. पुणे आणि नगर जिल्ह्यातही पावसाने दोन दिवसांपासून उघडीप दिली आहे. शेतकऱ्यांनी पेरण्यांची तयारी केली होती, पण उघडिपीमुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. झालेल्या पेरण्याही अडचणीत येण्याची भीती आहे.

उत्तर महाराष्ट्रात तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून, आतापर्यंत पावसाचे प्रमाण जेमतेमच राहिले आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत ५३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जळगाव जिल्ह्यात ४५.२ टक्के पाऊस झाला आहे. अल्प पावसामुळे पेरण्यांना अद्याप गती आलेली नाही. विदर्भात २४ जून रोजी मोसमी पावसाचे जोरदार आगमन झाले. उपराजधानीसह अमरावती, चंद्रपूर आदी जिल्ह्यांत काही ठिकाणी संथ, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पेरणीयोग्य पाऊस असल्याचे पाहून शेतकरीही सुखावला, पण गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांचेही गणित बिघडले आहे. विदर्भातील अकराही जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. जून महिन्यातील कमी पाऊस आणि आता जुलैच्या सुरुवातीस उघडीप दिल्यामुळे झालेल्या पेरण्याही अडचणीत आल्या आहेत.

मराठवाडय़ात १.९७ टक्केच पेरण्या

मराठवाडय़ात जूनमध्ये सरासरीच्या ४१ टक्के पाऊस झाला. केवळ १.९७ टक्के क्षेत्रावरच पेरण्या झाल्या आहेत. सोमवारी काही भागात झालेल्या पावसामुळे पेरणीचा वेग वाढू शकेल, असे सांगण्यात येत आहे. मात्र, सर्वदूर आणि पेरणी योग्य पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. पाऊस लवकर न झाल्याने मूग, उडीद या कडधान्यांची पेरणी करणे योग्य ठरणार नाही, असे कृषी विभागातून सांगण्यात आले.