फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी

पुणे : कोणत्याही परवान्याशिवाय सुरू असलेल्या दुचाकी टॅक्सीच्या विरोधात डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखालील शहरातील सर्वांत जुनी रिक्षा संघटनाही सक्रीय झाली आहे. दुचाकी टॅक्सी चालविणाऱ्या कंपनीवर सायबर कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. आंदोलन करणाऱ्या रिक्षा चालकांवर सरकारी कामात अडथळ्यचीा कारवाई होते, मग अनधिकृतपणे दुचाकी टॅक्सी चालविणाऱ्या कंपनीविरोधात प्रशासन, पोलीस बघ्याची भूमिका का घेत आहे, असा प्रश्न संघटनेने उपस्थित केला आहे.

Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Having trouble starting your car in winter
हिवाळ्यात गाडी सुरू करण्यात अडचणी येतायत? ‘या’ गोष्टी एकदा तपासून पाहा
Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण
iPhone News
iPhone : अँड्रॉईडऐवजी आयफोन असल्यास टॅक्सी APP बुकिंगचे दर वाढतात का? सोशल मीडियावर काय चर्चा?
Mumbi Cab Driver Arrested
Mumbai Cab Driver Arrested : मुंबईत १० मिनिटांच्या प्रवासासाठी घेतले २८,०० रुपये; NRI ची फसवणूक करणाऱ्या कॅब चालकाला अटक
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय

रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार यांच्या नेवृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले. शिष्टमंडळात रावसाहेब कदम, करीम सय्यद, आनंद बेलमकर, सिद्धार्थ चव्हाण, सोपन घोगरे यांचा समावेश होता. दुचाकी टॅक्सीच्या विरोधात रिक्षा संघटनांनी २८ नोव्हेंबर आणि १२ डिसेंबरला शहरा रिक्षा बंद केला आहे. या बंदमधून रिक्षा पंचायत दूर राहिली होती. मात्र, आंदोलन करणाऱ्या रिक्षा चालकांवर चुकीच्या कारवाईबाबत आवाज उठविणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. आरटीओ आणि पोलीस प्रशासनाकडे मागणी नोंदवून रिक्षा पंचायतीने आता दुचाकी टॅक्सीच्या विरोधात सक्रीय भूमिका घेतली आहे.

अनधिकृत बाईक टॅक्सी बंद करा या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या रिक्षा चालकांवर सरकारी कामात अडथळा, नागरिकांच्या येण्या-जाण्याला अडथळा आदींबाबत पोलीस पुढाकार घेऊन तीव्र कारवाई करत आहेत. मग बेकायदा टॅक्सी बाईक चालवणाऱ्या रॅपिडो कंपनी, त्यांच्या संचालकांविषयी प्रशासन आणि पोलीस बघ्याची भूमिका का घेत आहे? राज्य सरकारने एग्रीगेटरविषयी केंद्र सरकारच्या धोरणानुसार बाईक टॅक्सीला परवानगी दिलेली नाही. असे असताना एक एग्रीकेटर कंपनी आपल्या ॲपमध्ये बाईक टॅक्सीचा पर्याय ठेवते. त्यातून नागरिकांची फसवणूक करते. शासनसंस्थेला आव्हान देते. त्याच्यावर काय कारवाई प्रशासनाने केली? असा सवाल रिक्षा पंचायतीने उपस्थित केला आहे.

Story img Loader