डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२३ वी जयंती पुण्यात मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. विविध संस्था, संघटनांच्या वतीने आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी, पुणे शहर काँग्रेस शेतकरी महिला विकास सेल, पुणे शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय मजदूर संघ (इंटक), मानवाधिकार विभाग, पुणे विद्यापीठ, स्त्री आधार केंद्र, कॅन्टोन्मेन्ट कल्चर असोसिएशन, शिक्षक हितकारणी संघटना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुजन महासंघ, जनता दल (धर्मनिरपेक्ष), महाराष्ट्र प्रदेश युवक इंटक संघटना, पुणे नगर वाचन मंदिर, नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया, क्रांतिगुरू लहुजी महासंघ यांच्या वतीने पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. 
भीमशाही संघटनेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करून आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीमध्ये सुमारे पाच हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाच्या वतीनेही जयंती साजरी करण्यात आली. फुले-साठे-आंबेडकर विचारमंचाच्या वतीने महात्मा फुले, आंबेडकर आणि महावीर जयंतीनिमित्त स्मृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहामध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. राष्ट्रीय माथाडी जनरल कामगार सेनेतर्फे कॅम्प येथील आंबेडकर पुतळ्याजवळ नागरिकांना थंड पाणी आणि बिस्किटे वाटण्यात आली.
बहुजन विकास महासंघाच्या वतीने लहान मुलांना खाऊ वाटप आणि ज्येष्ठ नागरिकांना उन्हाळी टोप्यांचे वाटप करण्यात आले. लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने ससून रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. बहुजन क्रांतिकारी सेनेतर्फे (सामाजिक संघटना) बुद्धवंदना घेऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला. काँग्रेस कॅन्टोन्मेंट कमिटीचे सरचिटणीस आयाज पठाण यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भीमशक्ती मातंग आघाडीतर्फे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. भारिप बहुजन महासंघ युवक आघाडीतर्फे भीमजयंती जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवा फाउंडेशन आणि नारायण पेठेतील साने पार्किंमधील कर्मचाऱ्यांनी केक कापून जयंती साजरी केली. महावितरणातर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे महानगरपालिका सार्वजनिक वाचनालयातर्फे मतदान जनजागृतीची शपथ घेण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा