शाकाहार आणि व्यसनमुक्तीच्या प्रचार आणि प्रसारासाठी गेली चार दशके निष्ठेने अविरत कार्यरत असलेले डॉ. कल्याण गंगवाल सोमवारी (२७ जानेवारी) पंचाहत्तराव्या वर्षांत पदार्पण करत आहेत. प्रबोधनाची परंपरा पुढे नेण्यासाठी या परंपरेचे वारकरी व्हावे लागते, हे डॉ. गंगवाल यांनी त्यांच्या कार्यातून दाखवून दिले आहे. सर्वजीव मंगल प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी राज्यात आणि देशभरात कार्य केले आहे. अमृतमहोत्सवानिमित्त डॉ. गंगवाल यांच्याशी साधलेला हा संवाद.

* प्रश्न : डॉक्टर व्हायचे हे कसे ठरले?

Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Loksatta chaturang article English playwright Christopher Marlowe Dr Faust plays journey of life
मनातलं कागदावर : स्वर्ग की नरक?
Important research Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University shows that mosquitoes are repelled by yellow light of LED
डासांपासून त्रस्त झाले का? हे करून बघा, काय सांगते पिवळ्या दिव्याचे नवे संशोधन
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
Padmashri Physicist Dr Rohini Godbole Memoirs by Researcher Dr Radhika Vinze
विज्ञानव्रती
Dr Abhijeet and Dr Gauri Desais research for brown skin in America
… मोहे शाम रंग दई दे

– मी मूळचा संगमनेर येथील. मध्यमवर्गीय दिगंबर जैन कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. वडील जेमतेम तिसरीपर्यंत शिकलेले आणि आई तर अशिक्षित होती. आईला पाठदुखीचा विकार होता. मणक्यांमध्ये वेदना होत असे. त्या काळी संगमनेरमध्ये डॉक्टर नव्हते. आजारी असताना ती कोणतीही तक्रार न करता घरातील कामे करीत असे. तिच्या आजारपणामुळे मला डॉक्टर होण्याची प्रेरणा मिळाली. इयत्ता नववीमध्ये असताना ‘देवाचे घर’ या नाटकामध्ये मी एका सेवाभावी डॉक्टरची भूमिका केली होती. हीच भूमिका जीवनभर साकारावी हा निर्धार या नाटकाने पक्का केला.

*  प्रश्न : वैद्यकीय शिक्षण आणि पुढील वाटचाल कशी झाली ?

– संगमनेर येथील शालेय शिक्षणानंतर श्रीरामपूर येथील नारायणराव बोरावके महाविद्यालयात प्री-प्रोफेशनल अभ्यासक्रम केला. १९६२ मध्ये पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. एम. बी. बी. एस. पदवी संपादन करताना मेडिसीन या विषयात प्रावीण्यही मिळवले. पुणे विद्यापीठातर्फे दिल्या जाणाऱ्या २७ पैकी २३ विषयांत सुवर्णपदकाचा मानकरी ठरलो. प्रारंभीचा काही काळ के. ई. एम. रुग्णालयात काम केले. येथे येणारे रुग्ण तपासतानाच त्यांच्या आर्थिक स्थितीकडे माझे लक्ष गेले.  त्यातूनच माझ्यातील सामाजिक कार्यकर्ता घडत गेला. गरीब रुग्णांवर मोफत उपचारांचा उपक्रम याच जाणिवेतून आकाराला आला. वैद्यकीय खर्चामध्ये रुग्णालयाने सवलत द्यायची आणि औषधोपचारासाठी मी पैसे द्यायचे असा अलिखित करार डॉ. बानू कोयाजी आणि माझ्यामध्ये झाला. त्याद्वारे हजारो रुग्णांवर उपचार करू शकलो.

*  प्रश्न : सामाजिक बांधिलकीची जाणीव विकसित झाली, त्याबद्दल काय सांगाल?

रोग झाल्यावर उपचार केले जातात. पण, मुळात रोग होतातच का, त्याला माणसांच्या सवयी किती कारणीभूत ठरतात, यावर मी चिंतन सुरू केले. त्यातून बदलती जीवनशैली आणि चुकीच्या धारणांमुळे आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे माझ्या निदर्शनास आले. शाकाहार आणि व्यसनमुक्तीचे त्यांचे ध्येय आकाराला येत गेले आणि या कामामध्ये स्वत:ला झोकून देण्याचे ठरविले. मांसाहारामुळे होणारे तोटे, आरोग्यावर होणारे परिणाम मी अधोरेखित करू शकलो. या कामाची निर्भत्सना झाली तरी मी डगमगलो नाही. मी कधीच व्यसनी माणसांची किंवा व्यसनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची घृणा केली नाही. एखादा डॉक्टर जितक्या प्रेमाने आपल्या रुग्णाकडे पाहतो, तितक्याच ममत्वाने मी व्यसनी माणसांकडे पाहत राहिलो. त्यातूनच पुढे ‘गुटख्याला द्या झटका’ हे आंदोलन गावोगाव पसरत गेले आणि त्यातून तळागाळापर्यंत प्रबोधन घडले. प्रलोभनांना बळी पडत नाही हे ध्यानात आल्यानंतर गुटखा उत्पादकांच्या लॉबीने माझ्यावर तीनदा प्राणघातक हल्ले केले. पण, त्यातून मी बचावलो. जिद्दीने आणि शांतपणे आपले काम करत राहिलो. गुटख्यामुळे कर्करोग तर होतोच. पण, नपुंसकत्व येते हे मी प्रयोगाने सिद्ध केले. राज्य शासनाने गुटखाबंदी जाहीर केली.

*  प्रश्न : सर्व जीव मंगल प्रतिष्ठानच्या कार्याचे अधिष्ठान कोणते?

– ‘जगा आणि जगू द्या’ हा भगवान महावीर यांनी दिलेला संदेश हेच सर्व जीव मंगल प्रतिष्ठानच्या कार्याचे अधिष्ठान आहे. आज जगभरातच शाकाहाराचे महत्त्व अधोरेखित केले जात आहे. माझ्या या कार्याची दखल इंडियन व्हेजिटेरियन काँग्रेसने घेतली असून, ‘टॉर्च बेअर ऑफ व्हेजिटरेनियम’ या शाकाहार प्रसाराच्या क्षेत्रातील सर्वोच्च बहुमानाने सन्मान केला आहे. मंदिर उभारण्यापेक्षा मिळालेल्या उत्पन्नातील ५० टक्के रक्कम सामाजिक कामासाठी देईन या वडिलांना दिलेल्या वचनाचे पालन आजही मी करत आहे.

तुळजापूरमधील अजाबळी प्रथेला तसेच बैलगाडा शर्यतींनाही विरोध करत, त्या बंद व्हाव्यात म्हणून सातत्याने प्रयत्न केले. बैलगाडा शर्यतींवर पुढे बंदी.

* प्रश्न : वैयक्तिक जीवनाबाबत तुमचे मनोगत काय?

– पैसे नसले तरी कोणताही रुग्ण उपचाराविना जात नाही याचा विश्वास आणि भरवसा सर्वाना वाटतो. वैद्यकीय सेवा असो किंवा सामाजिक कार्य या साऱ्या वाटचालीमध्ये पत्नी डॉ. चंद्रकला, डॉ. परितोष आणि डॉ. आनंद ही मुले आणि वैद्यकीय क्षेत्रातच काम करणाऱ्या दोन्ही सुना यांचे बहुमोल योगदान लाभते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि प्रणव मुखर्जी या माजी राष्ट्रपतींच्या हस्ते माझा सन्मान झाला आहे. मी निश्चितच समाधानी आणि कृतज्ञ आहे.

मुलाखत- विद्याधर कुलकर्णी