देशात सध्या काही प्रवृत्ती आक्रमक झाल्या असून, त्यांनीच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केली आहे. या प्रवृत्तींचा विरोध करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे आवाहन ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे यांनी केले. डॉ. दाभोलकरांच्या हत्येपूर्वी व नंतरही त्यांच्याविषयी ‘सनातन प्रभात’मध्ये छापलेल्या मजकुराबाबत खटले दाखल झाले पाहिजेत, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जादूटोणाविरोधी कायद्याची माहिती असलेल्या सचित्र पुस्तकाचे प्रकाशन पानसरे यांच्या हस्ते रविवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. हमाल पंचायतीचे नेते डॉ. बाबा आढाव, अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील तसेच चंद्रशेखर जोशी, संजय बनसोडे, मिलिंद देशमुख, हमीद दाभोलकर या वेळी उपस्थित होते.
पानसरे म्हणाले, काही आक्रमक प्रवृत्ती देशात निर्माण झाल्या आहेत. त्यांनीच ही हत्या केली. या प्रवृत्तींच्या विरोधात लढा दिला पाहिजे. जादूटोणाविरोधी कायदा झाला व त्यानंतर नांदेड येथे पहिला खटला दाखल करण्यात आला. हा खटला पाहिला, तर हा कायदा कोणत्याही एका समाजाच्या विरोधात नाही, हे दिसून येते.
आढाव म्हणाले, की समाजाच्या सर्व घटकांतील अनिष्ट रूढी, परंपरांचे निर्मूलन करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रयत्न करावेत. हे कार्य महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता संपूर्ण देशामध्ये समितीने कार्य वाढवावे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा