पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डाॅ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) तपास अधिकारी एस. आर. सिंग यांची उलटतपासणी मंगळवारी पूर्ण झाली. सीबीआयने आतापर्यंत केलेल्या तपासाबाबतचा अंतिम अहवाल १३ सप्टेंबर रोजी न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डाॅ. दाभोलकर हत्या प्रकरणात डाॅ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, विक्रम भावे, ॲड. संजीव पुनाळेकर यांच्याविरुद्ध आराेप निश्चित करण्यात आले आहेत. डाॅ. दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयचे तत्कालीन तपास अधिकारी एस. आर. सिंग यांची बचाव पक्षाकडून उलटतपासणी घेण्यात आली. मंगळवारी (५ सप्टेंबर) उलटतपासणी पूर्ण झाली. ॲड. सुवर्णा वस्त यांनी सिंग यांची उलट तपासणी घेतली. आतापर्यंत सीबीआयकडून याप्रकरणात २० साक्षीदारांची साक्ष नोंदविली. त्यांची उलटतपासणी घेण्यात आली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह ससून रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागातील डाॅ. अजय तावरे, पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रानगट, तपास अधिकारी एस. आर. सिंग यांची उलटतपासणी घेण्यात आली.

हेही वाचा >>>सामूहिक रजा आंदोलनात ६५ हजार शिक्षकांचा सहभाग

सीबीआयने निश्चित केलेल्या सर्व साक्षीदारांची साक्ष, तसेच उलटतपासणी पूर्ण झाली आहे. याप्रकरणात आणखी काही साक्षीदार न्यायालयात सादर करायचे असल्यास याबाबतची यादी सीबीआयला न्यायालयात सादर करावी लागणार आहे. तपासाबाबतचा अंतिम अहवाल, तसेच नव्याने काही साक्षीदार निश्चित केल्यास त्यांची नावे १३ सप्टेंबर रोजी न्यायालयात सादर केली जाणार आहे, अशी माहिती सीबीआयचे विशेष सरकारी वकील ॲड. प्रकाश सूर्यवंशी यांनी न्यायालयात दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr narendra dabholkar murder case cbi investigation report in court on september 13 pune print news rbk 25 amy
Show comments