‘वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे असे म्हटले जाते. मात्र, ही वस्तुस्थिती नाही. सकस साहित्य दिले, तर लोक नक्कीच त्याची दखल घेतात,’ असे मत केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी शनिवारी व्यक्त केले.
कलारंग संस्थेच्या वतीने डॉ. जाधव यांना ‘साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे’ पुरस्काराने गौरवण्यात आले, त्या वेळी डॉ. जाधव बोलत होते. या वेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख रावसाहेब कसबे, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे सचिव सोमनाथ पाटील, अभिनेता राहुल सोलापूरकर, माजी नगरसेवक अप्पा बागल, किसन नेटके, कलारंगचे अध्यक्ष अमित गोरखे आदी उपस्थित होते.
या वेळी डॉ. जाधव म्हणाले, ‘‘अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने मिळालेला सन्मान माझ्यासाठी मोठे भाग्य आहे. आजपर्यंत ६१ व्यक्तींच्या नावाने पुरस्कार मिळाले. अण्णा भाऊंच्या नावाची उणीव होती ती देखील पूर्ण झाली.’’ या वेळी स्थानिक साहित्यिकांचाही सत्कार करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा