लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: विधान परिषदेच्या उपसभापती, ठाकरे गटाच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करत एकनाथ शिंदे गटात सहभागी होणार आहेत. शिंदे गटातील त्यांचा पक्षप्रवेश मुंबईत शुक्रवारी सायंकाळी होण्याचे निश्चित झाले आहे. त्यांच्या बरोबर विधान परिषदेचे एक आमदारही प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला धक्का बसणार आहे.

डॉ. गोऱ्हे ठाकरे गटाच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जातात. ठाकरे गटातील प्रमुख महिला नेत्या म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. भाजप बरोबरची शिवसेनेची युती तुटल्यानंतर ठाकरे यांची बाजू त्यांनी समर्थपणे सांभाळली होती. त्यांच्या शिंदे गटात प्रवेशाच्या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Story img Loader