शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे दसरा मेळावा होणार आहे. बाकीच्यांनी काय करावे. हा त्यांचा प्रश्न असून लोकशाहीमध्ये चांगले तोडगे निघत असतात. पण एक मैदान एक नेता ही अनेक वर्षाची परंपरा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसैनिकांनी चालवली असल्याची भूमिका उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मांडली.

पुणे शहरातील मानाच्या गणपतीचे दर्शन शिवसेना नेत्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी कुटुंबियांसह घेतले. यावेळी शहरातील आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, मागील काही काळात अनेक घटना घडल्या आहेत. पण शिवसेना पक्षाने आजवर प्रत्येक संकटामधून फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेतली आहे.

Prahlad Joshi statement that the plan of Congress in Karnataka is on the verge of closure Kolhapur news
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
book review Navi Pidhi Navya Vata book by Prakash Amte
पुढच्या पिढीची कर्तबगारी!
Maharashtra kunbi vidhan sabha
कुणबी समाजाला डावलल्याची खंत, यवतमाळात तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न
Shivajinagar Constituency BJP Vs Congress Rebellion in Congress Congress nominated Dutta Bahirat against BJP MLA Siddharth Shirole Pune
शिवाजीनगरमध्ये ‘सांगली पॅटर्न?’
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : खंक तिजोरी ओरबाडण्याचा कार्यक्रम
Assembly Election 2024 Malegaon Outer Constituency Dada Bhuse print politics news
लक्षवेधी लढत: मालेगाव बाह्य : मंत्री दादा भुसे यांचा मार्ग यंदा खडतर
loksatta readers feedback
लोकमानस: संशय आणि असुरक्षिततेचा परिणाम

त्यामुळे भगवद्गीतेत सांगितल आहे की, जे कोणी गेलेले आहेत, त्यांचा शोक करीत बसू नका. त्या भूमिकेतून काम चालल आहे. कधी ना कधी घर का भुला हुआ, परत येईल अस मला स्वतःला वाटत आहे. पण या संदर्भात जो काही अंतिम निर्णय घ्यायचा आहे. तो सर्वस्वी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे,पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. अशी भूमिका त्यांनी मांडली. साध्य जी राजकीय टीका टिप्पणी सुरू आहे त्यावर त्या म्हणाल्या की सध्या जी काही टीका सुरू आहे ती सामाजिक,राजकीय प्रश्नापेक्षा सुधा नागरिकांच्या डोळ्यात धुरळा उडवयाचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यावरील सर्व संकट दूर कर,राजकीय, सामाजिक पर्यावरण आपल्याला पाहण्यास मिळो , अशी प्रार्थना गणरायाकडे असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : पुणे : ३० टक्के भाजपचे काँग्रेसीकरण ; जयंत पाटील यांची टीका

पक्षाच्या डोळ्या प्रमाणे आम्हाला फक्त शिवसेनाचा धनुष्यबाण दिसतो : नीलम गोऱ्हे

दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या सोबत राज ठाकरे असणार आणि ते भाषण करणार असल्याची चर्चा आहे. त्यावर त्या म्हणाल्या की, आपल्याला एखाद्या दूरध्वनीवर आवाज येतो. त्यावेळी आसपासचा अनेक गोंधळ ऐकू येत असतो. त्या गोंधळाकडे लक्ष देत नाही. त्यामुळे पक्षाच्या डोळ्या प्रमाणे आम्हाला फक्त शिवसेनाचा धनुष्यबाण दिसत असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

पुणे : गणेश विसर्जनासाठी पुणे महापालिकेची तयारी पूर्ण

मिलिंद नार्वेकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलण टाळलं

मागील दोन महिन्यामध्ये जे राजकीय नाट्य घडले. त्यामधील शिवसेनेचे बंडखोर आमदार मंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत जाऊन राज्यात शिंदे, फडणवीस सरकार आणल आहे. तर दुसर्‍या बाजूला गणेशोत्सव दरम्यान एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. यामुळे अनेक चर्चाना उधाण आले. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली. हा प्रश्न सर्वाना पडला आहे. यावर दोन्ही नेत्याकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आली नाही.

त्याच दरम्यान शिवसेना नेते सचिव मिलिंद नार्वेकर यांनी कुटुंबियांसह आज पुणे शहरातील मानाच्या पाच गणपतीचे दर्शन घेतले.त्यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना नेत्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह शहरातील आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. मात्र यावेळी मिलिंद नार्वेकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलणे टाळले.