इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक आणि समीक्षक डॉ. सदानंद मोरे यांना अज्ञात व्यक्तींकडून फोनवर जिवे मारण्याची धमकी आल्याची तक्रार त्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. त्यानुसार त्यांना सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे.
एका कार्यक्रमात वाहिनीवरील कार्यक्रमात डॉ. मोरे यांनी नरेंद्र मोदी आणि फॅसिस्टवाद याबाबत जाहीर भाष्य केले होते. त्याच बरोबर त्यांनी लता मंगेशकर यांच्यापासून ते सध्याची राजकीय स्थिती, २०१४ च्या निवडणुका आणि देशात फॅसिस्ट विचाराचे सरकार आले तर देशापुढे व समाजापुढे मोठा धोका असल्याचे मत व्यक्त केले होते. या कार्यक्रमानंतर अज्ञात व्यक्तींनी त्यांना फोन करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबतचा तपास चतु:शृंगी पोलीस करत आहेत.
याबाबत डॉ. मोरे यांनी सांगितले, की एका वृत्त वाहिनीवर मुलाखतीचा कार्यक्रम झाल्यानंतर ९ नोव्हेंबर रोजी मोबाइलवरून धमकीचा फोन आला. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ प्रतिसाद देत सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे.
जिवे मारण्याची धमकी आली असून त्याबाबत पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त एम. बी. तांबडे यांनी सांगितले, की त्यांना धमकी आल्याच्या पाश्र्वभूमीवर पुणे पोलिसांकडून त्यांना सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे.
डॉ. सदानंद मोरे यांना जिवे मारण्याची धमकी
इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक आणि समीक्षक डॉ. सदानंद मोरे यांना अज्ञात व्यक्तींकडून फोनवर जिवे मारण्याची धमकी आल्याची
First published on: 14-11-2013 at 02:59 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr sadanand more threaten to kill by blank call