ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांची ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शुक्रवारी निवड झाली.
संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ कवी प्रा. विठ्ठल वाघ, लेखर शरणकुमार लिंबाळे, लेखक-प्रकाशक अरूण जाखडे, श्रीनिवास वारुंजीकर आणि श्रीपाल सबनीस असे पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. श्रीपाल सबनीस यांना सर्वाधिक ४८५ मते पडली. विठ्ठल वाघ यांना ३७३, अरूण जाखडे यांना २३०, शरणकुमार लिंबाळे यांना २५ तर श्रीनिवास वारुंजीकर यांना अवघी दोन मते पडली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद आडकर यांनी मतमोजणीनंतर श्रीपाल सबनीस यांच्या विजयाची घोषणा केली.
साहित्य महामंडळाने मताधिकार असलेल्या सदस्यांकडे एकूण एक हजार ७५ मतपत्रिका पाठविल्या होत्या. त्यापैकी गुरुवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत एक हजार ३३ मतपत्रिका महामंडळाकडे परत आल्या होत्या. त्याची मतमोजणी शुक्रवारी करण्यात आली. साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठीच्या आजवरच्या निवडणुकीतील हे सर्वोच्च मतदान असल्याचे आडकर यांनी सांगितले.
पुढीलवर्षी जानेवारीमध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये हे संमेलन होणार आहे. पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ या संमेलनाची संयोजक संस्था आहे.
मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीपाल सबनीस
पुढीलवर्षी जानेवारीमध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये हे संमेलन होणार आहे.
Written by विश्वनाथ गरुड
Updated:
First published on: 06-11-2015 at 13:28 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr shripal sabnis elected as president of 89th marathi sahitya sammelan