ग्राहकांकडून मागणीत वाढ; नोव्हेंबपर्यंत या फळाचा हंगाम सुरू

गुलटेकडी येथील घाऊक बाजारात ड्रॅगन फळांची आवक सुरू झाली असून, फळबाजारात सध्या दररोज दोन ते तीन टन ड्रॅगन फळांची आवक होत आहे. या फळांचा हंगाम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत सुरू राहील. आरोग्याच्या दृष्टीने ड्रॅगन फळाला गेल्या काही वर्षांपासून मागणी वाढत आहे.

Nitrate levels in groundwater are increasing in seven districts of Maharashtra What are the risks print exp
महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत भूजलात नायट्रेटचे वाढते प्रमाण? कोणते धोके? 
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
financial news loksatta
राज्य उत्पन्नाच्या प्रभावी अंदाजासाठी माहितीची गतीमान देवाणघेवाण आवश्यक, राज्य उत्पन्न सल्लागार समितीच्या बैठकीचा सूर
low prices of tur in market
विश्लेषण : बाजारपेठेत तुरीच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांशी कोंडी कशी?
diamond imprest authorisation
केंद्र सरकारची हिरे निर्यातीला चालना देण्यासाठी विशेष योजना
Farmers of Yavatmal district support Shaktipeeth highway
शक्तिपीठ महामार्गाला यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे समर्थन; भूसंपादन प्रक्रिया तत्काळ…
Chandrashekhar Bawankule statement regarding the purchase of agricultural materials during Dhananjay Munde era
धनंजय मुंडेंच्या काळातील कृषी साहित्य खरेदी: बावनकुळे काय म्हणाले?
Dhananjay Munde
धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या? कृषी साहित्य खरेदीप्रकरणी कोर्टात सुनावणी; वाढीव दर आकारल्याचा याचिकाकर्त्याचा दावा

परदेशी फळांना भारतीय बाजारपेठेत मागणी वाढत आहे. पुण्यातही परदेशी फळांची आवक वाढत आहे. ड्रॅगन फळ मूळचे थायलंड आणि चीनमधील आहे, मात्र भारतीय बाजारपेठेतून या फळाला असलेली वाढती मागणी विचारात घेऊन स्थानिक शेतकऱ्यांनी ड्रॅगन फळाचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. पंधरवडय़ापासून ड्रॅगन फळांची आवक सुरू झाली आहे. गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात ड्रॅगन फळांची आवक वाढली आहे. या फळाला प्रतिकिलो एकशेवीस ते दीडशे रुपये असा भाव मिळाला, अशी माहिती फळबाजारातील व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी दिली.

पुणे जिल्हय़ातील बारामती, बीड जिल्ह्य़ातील आष्टी, नगरमधील मिरजगाव, सातारा जिल्हय़ातील फलटण भागात ड्रॅगन फळाचे उत्पादन शेतकऱ्यांकडून मोठय़ा प्रमाणावर घेण्यात येत आहे. या फळास कीड तसेच रोगराईचा फटका बसत नाही. त्यामुळे औषध फवारणी कमी करावी लागते. सध्या ड्रॅगन फळाची प्रतवारी उत्तम आहे. ड्रॅगन फळ आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे. या फळाचे सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे ग्राहकांकडून या फळांना चांगली मागणी आहे. या फळाचा गर गुलाबी किंवा पांढरा असतो. लाल रंगाचा गर असलेल्या ड्रॅगन फळाला मागणी वाढत आहे. लाल रंगाचा गर असलेल्या फळाला प्रतिकिलो वीस ते तीस रुपये जास्त भाव मिळतो. हे फळ चवीला आंबटगोड असते.

नगदी फळ

ड्रॅगन हे फळ मूळचे थायलंड आणि चीनमधील आहे, मात्र गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या फळाची मोठय़ा प्रमाणावर लागवड करण्यास सुरुवात केली आहे. पुणे, मुंबई तसेच अन्य शहरांत या फळांना मागणी चांगली आहे. त्यामुळे ड्रॅगन फळ शेतकऱ्यांच्या दृष्टीने हमखास उत्पन्न मिळवून देणारे फळ ठरले आहे. या फळाला कीड लागत नाही तसेच औषध फवारणीचा खर्च येत नाही. त्यामुळे ड्रॅगनची लागवड शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरली आहे.

चार वर्षांपूर्वी पाच एकरांत ड्रॅगन फळाची लागवड केली होती. वर्षांला प्रतिएकरामागे दोन लाख रुपये उत्पन्न मिळते. या फळाची लागवड करण्यासाठी औषध फवारणी करावी लागत नाही. उत्पादन राज्याच्या अन्य भागांतील शेतकऱ्यांनी घेतल्यास फायदेशीर ठरेल. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे नगदी फळ ठरले आहे.

भीमराव ढोणे, फलटण

Story img Loader