लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेले संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या एटीएस कोठडीची मुदत मंगळवारी (९ मे) संपणार आहे. कुरुलकर यांना आज एटीएसच्या पथकाकडून पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Pune Municipal Corporation construction department issued notices to 125 construction projects in the city and stopped work Pune print news
पुणे: बांधकाम बंद ठेवण्याच्या नोटिशींचा ‘फार्स’ ?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय
martyred soldier shubham ghadge cremated news in marathi
सातारा : शहीद शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
share market Major indices, share market ,
स्फुरणाअभावी निर्देशांकांना सुस्ती
thane police
कल्याणमध्ये तळीरामांची पोलीस उपायुक्तांकडून खरडपट्टी
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात
nada update on hima das suspension creates confusion
हिमा दासच्या निलंबन कालावधीवरून गोंधळ

कुरुलकर यांची चौकशी तसेच त्यांच्याकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासात मिळालेली माहिती एटीएसकडून न्यायालयात सादर केली जाणार आहे. एटीएसच्या तपासत अहवालातून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

आणखी वाचा-‘डीआरडीओ’चे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

एटीएसकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासाची माहिती न्यायालयात सादर केली जाणार आहे. कुरुलकरांची चौकशी तसेच त्यांनी तपासात दिलेली माहिती न्यायालयात सादर केली जाणार आहे. सुरक्षेचा भाग म्हणून कुरुलकर यांची गोपनीय ठिकाणी चौकशी सुरू आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणेतील (रिसर्च अँड ॲनलिसिस विंग- राॅ) अधिकाऱ्यांकडून कुरुलकरांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या तपासात मिळालेली माहिती तसेच पुढील तपासाचे मुद्दे याबाबतचा अहवाल एटीएसकडून न्यायालयात सादर केला जाणार आहे. त्यांच्याकडून मोबाइल संच आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. कुरुलकर यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्राॅनिक उपकरणांचे तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे. तपास अहवालातून अनेक धक्कादायक बाबी प्रकाशात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कुरुलकर सध्या राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) कोठडीत आहेत. विशेष न्यायालयाने त्यांना मंगळवारपयर्यंत (९ मे) एटीएस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता.

Story img Loader