लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरुन अटकेत असलेले ‘डीआरडीओ’चे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या एटीएस कोठडीची मुदत सोमवारी (१५ मे) संपणार आहे. कुरुलकर यांना शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

पाकिस्तानाला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले कुरुलकर यांना सोमवारपर्यंत (१५ मे) एटीएस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर दिला होता. कुरुलकर यांच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात दुपारी हजर करण्यात येणार आहे. एटीएसकडून करण्यात आलेल्या तपासाबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.

आणखी वाचा-पुणे: खडकवासला धरणात नऊ मुली बुडल्या

कुरुलकर यांना पाकिस्तानातून काही ई-मेल पाठविण्यात आले आहेत. कुरुलकर यांनी देशाच्या सुरक्षेला बाधा आणणारी काही छायाचित्रे पाठविल्याचा संशय आहे. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या लॅपटाॅप आणि मोबाइल संचाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले असून,याबाबतचा अहवाल एटीएसने न्यायालयात सादर केला होता. त्यानंतर न्यायालयाने कुरुलकर यांना १५ मे पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drdo director pradeep kurulkar will be produced in court in pune today pune print news rbk 25 mrj