लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : लोहगावात गेल्या बारा वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी कॉर्पोरेशनचा (एमपीएमसी) गृहनिर्माण प्रकल्प साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षभरापासून केलेल्या पाठपुराव्यामुळे नेदरलँडमधील एका निमशासकीय संस्थेशी करार (टर्मशीट) करण्यात आला आहे. या संस्थेच्या माध्यमातून गृहनिर्माणासाठी ६०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने पोलिसांच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
mukkampost bombilwadi mazi ladki janta yojna
मुक्कामपोस्ट बोंबिलवाडीची ‘लाडकी जनता योजना!’, पोस्ट होतेय व्हायरल, काय आहे ही योजना? वाचा…
Dnyanradha Multi State Co Operative Credit Society, fraud case, ED
ईडीकडून ३३३ कोटींच्या मालमत्तेवर टाच
Loksatta anvyarth Confusion in Assembly session after Jammu and Kashmir became Union Territory
अन्वयार्थ: काश्मिरी राजकारणाचा बदलता ‘दर्जा’
maharashtra vidhan sabha election 2024 ,
बेलापूरच्या प्रचारात राम, कृष्ण, गजाननाचा गजर !

कराराची कागदपत्रे एमपीएमसीकडे नुकतीच हस्तांतरित करण्यात आली आहे, अशी माहिती रुरल एन्हान्सर्स संस्थेचे प्रमुख, तसेच परदेशी गुंतवणुकीचे समन्वयक अंबर आयदे यांनी दिली. शनिवारी पार पडलेल्या एका कार्यक्रमात याबाबतची कागदपत्रे अटल कन्सल्टिंगचे प्रकल्प व्यवस्थापक अनिल कुमार कुप्पा यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आली. यावेळी अटल कन्सल्टिंग नेदरलँडचे व्यवस्थापकीय संचालक श्रीहान बाटले दृरदृश्य प्रणाली तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपस्थित होते. एमपीएमसीचे अध्यक्ष भरतकुमार राणे उपस्थित होते.

आणखी वाचा-पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील

राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या ५२४८ घरांचा, तसेच १६० दुकानांचा प्रकल्प लोहगावमधील ११७ एकरांवर साकारण्यात येणार आहे. संबंधित प्रकल्प २०१२ पासून रखडला होता. पोलिसांच्या घरांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी पाठपुरावा केला. राज्य शासनाचे एफडीआय प्रमुख आणि सहसचिव कौस्तुभ धावसे यांनी या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्थांकडून गुंतवणूक आणण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. त्याअनुषंगाने ८ सप्टेंबर रोजी मुंबईत नेदरलँडस्थित संस्था आणि उपमुख्यमंत्री कार्यालयात बैठक आयेजित करण्यात आली. या बैठकीनंतर गुंतवणूक करण्याचे निश्चित झाले. त्यानिमित्ताने एक छाेटेखानी सोहळा मुंबईत पार पडला, असे अंबर आयदे यांनी नमूद केले.

आणखी वाचा-पिंपरी : चिंचवडमध्ये आमदारांच्या नातेवाइकांचा कंत्राटदार ‘पॅटर्न’; कोणी केला हा आरोप

प्रकल्प रखडल्याने पोलिसांना मनस्ताप

एमपीएमसी प्रकल्पाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यांमध्ये जवळपास ५२४८ सदनिका आणि जवळपास १६० दुकानांचे हस्तांतरण करणे या प्रकल्पाचे विकसक बिलोमोरिया यांना बंधनकारक होते. काही कारणांमुळे तो रखडला. हक्काच्या घरासाठी पोलिसांनी पैसे भरले होते. काहींनी कर्ज काढले होते. करोना संसर्ग काळात काही जणांचा मृत्यू झाला. लोहगावमधील गृहनिर्माण प्रकल्प रखडल्याने पोलिसांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्यामुळे लोहगावमधील पोलिसांच्या रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी परदेशातील संस्थेकडून निधी उपलब्ध झाला. सर्व सदनिकाधारकांना मूळ किमतीत सदनिका कशी देता येईल, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. -भरतकुमार राणे, अध्यक्ष, महाराष्ट्र पोलीस मेगा कॉर्पोरेशन सिटी, लोहगाव, पुणे</strong>