पुणे : तस्करी करुन आणलेले चार कोटी ४७ लाख रुपयांचे सहा किलो सोने महसूल गुप्तचर संचालनालयाच्या(डीआरआय) पथकाने तळेगाव टोल नाका परिसरात जप्त केले. मुंबईहून पुण्यात बसने तस्करी करुन आणलेले सोने पाठविण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर ‘डीआरआय’च्या पथकाने ही कारवाई केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना तालमीतील मित्र त्यांच्याच बंदोबस्तासाठी भेटतो तेव्हा…

याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध सीमाशुल्क अधिनियम १९६२ च्या तरतूदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईहून तस्करी करुन आणलेले सोने खासगी बसने पुण्यात पाठविले जाणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने सापळा लावून कारवाई केली. बसमधील संशयित व्यक्तींची झडती घेण्यात आली. तेव्हा दोन पाकिटात सोने सापडले. औषधी कॅप्सुलमध्ये सोन्याची भुकटी भरल्याचे उघडकीस आले. ‘डीआरआय’च्या पथकाने चौकशी केली. त्यानंतर तस्करी करुन आणलेले सोने पुरविणारा, त्याच्या साथीदारांना मुंबई आणि पुण्यातून अटक करण्यात आली. चौघे आरोपी तस्करी करुन आणलेल्या सोन्याची विक्री करत असल्याची माहिती तपासात मिळाली.

हेही वाचा >>> ‘पर्वती’वरून महाविकास आघाडीत तिढा

त्यांच्याकडून पाच किलो ९१८ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत चार कोटी ४७ लाख रुपये आहे. तस्करीतून मिळालेली २२ लाखांची रोकड आरोपींकडून जप्त करण्यात आली.

दिवाळीत सोन्याला मागणी दिवाळीत सोन्याला मागणी वाढते. मुहूर्तावर सोने खरेदी केली जाते. सोने खरेदीतून सराफ बाजारात मोठी उलाढाल होते. सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. तस्करी करुन आणलेले सोने कोणाला देण्यात येणार होते, यादृष्टीने ‘डीआरआय’च्या पथकाकडून तपास करण्यात येत आहे. यापूर्वी दुबईहून तस्करी करून आणलेले सोने केंद्रीय सीमाशुल्क विभागाने (कस्टम) पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर जप्त केले होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dri seized smuggled gold worth rs 4 5 crore at talegaon toll plaza pune print news rbk 25 zws