लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: वाहन चालवण्याचा परवाना आणि इतर कागदपत्रे कालसुसंगत करीत सरकारने त्यांना अत्याधुनिक स्मार्ट स्वरूप दिले. यामुळे कागदी परवाना जाऊन त्याजागी स्मार्टकार्डरूपी वाहन परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र आले. आता स्मार्टकार्डलाही सरकारी विलंबाची बाधा झाली आहे. राज्यभरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्मार्टकार्डचा तुटवडा असून, वाहन चालकांना परवाना आणि वाहन नोंदणीच्या स्मार्टकार्डसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
याबाबत पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याचे सांगितले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी मात्र, पुण्यात स्मार्टकार्डचा तुटवडा नसल्याचे सांगितले. परंतु, पिंपरी-चिंचवडमध्ये स्मार्टकार्डची समस्या असल्याचे नमूद केले. आरटीओ अधिकाऱ्यांकडून स्मार्टकार्डबाबत सारवासारव केली जात असली तरी वाहन चालकांकडून वेळेत वाहन चालवण्याचा परवाना आणि वाहन नोंदणीच्या प्रमाणपत्राचे स्मार्टकार्ड मिळण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी येत आहेत.
आणखी वाचा- पुणे: ई-वाहनांची विक्री सुसाट; चालू वर्षात दुचाकी, तीन चाकींची ग्राहकांकडून सर्वाधिक मागणी
पुणे, पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयांसह राज्यभरातील २३ आरटीओंमध्ये स्मार्टकार्डची टंचाई आहे. परिवहन विभागाला तीन कंपन्या स्मार्टकार्डचा पुरवठा करतात. यापैकी एका कंपनीला उत्पादनात समस्या येत आहे. स्मार्टकार्डमधील चिप मिळत नसल्याने उत्पादनावर परिणाम होऊन टंचाई निर्माण झाली आहे. परिवहन विभागाने या कंपनीला दहा दिवसांची अंतिम मुदत दिली आहे. या कंपनीने दहा दिवसांत स्मार्टकार्डचा पुरवठा सुरळीत करावा, अशी नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पुण्यात दिवसाला वाहन चालवण्याचे सुमारे १ हजार ८०० परवाने दिले जातात. सध्या स्मार्टकार्डच्या टंचाईमुळे १ हजार ४०० परवाने दिले जात आहेत. पुणे कार्यालयातील परिस्थिती गंभीर नसल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी स्मार्टकार्ड वेळेत मिळत नसल्याचे वाहनचालकांना नाहक मनस्ताप होत आहे. आमच्याकडून सगळी प्रक्रिया वेळेत पूर्ण केली जाते, परंतु आरटीओला वेळेचे बंधन नाही का, असा प्रश्न वाहनचालक उपस्थित करीत आहेत.
आणखी वाचा- काका मला वाचवा म्हणत उद्धव ठाकरे ‘सिल्व्हर ओक’वर लोटांगण घालत गेले: मंत्री शंभूराज देसाई
पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वाधिक फटका
पिंपरी-चिंचवड आरटीओमध्ये १ फेब्रुवारीपासून वाहन चालवण्याच्या परवान्याचे एकही स्मार्टकार्ड देण्यात आलेले नाही. स्मार्टकार्डचा पुरवठा नसल्याने ही प्रक्रिया ठप्प झाली आहे. या आरटीओ दिवसाला वाहन चालवण्याचे सुमारे ८०० परवाने दिले जातात. आतापर्यंतची ३३ हजारांहून अधिक स्मार्टकार्ड प्रलंबित आहेत, असे सूत्रांनी सांगितले.