पुणे : रेल्वे गाडीतून सुरू असलेली गांजाची तस्करी पुणे रेल्वे स्थानकावर पकडण्यात आली. गाडीतून ३२ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी रेल्वे सुरक्षा दलाच्या द्रोणा या श्वानाने केली आहे.भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस पुणे स्थानकावर आल्यानंतर तिची तपासणी करण्यात आली. रेल्वे सुरक्षा दलाचे पथक द्रोणा श्वानासोबत स्थानकावर गाडीची नियमित तपासणी करीत होते. गाडीतील सामान्य श्रेणीच्या डबा तपासत असताना डब्यात एक ट्रॉली बॅग आढळली. त्या बॅगेजवळ कोणी नव्हते. ट्रॉलीचा वास श्वान द्रोणाने घेतल्यावर त्यात काही संशयास्पद वस्तू असल्याचा इशारा त्याने हँडलर जवानाला केला. रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने तपासणी केली असता बॅगेमध्ये ३२ किलो गांजा आढळला.

हा जप्त केलेला गांजा लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून, पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अमली पदार्थ कारवाया प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. श्वान द्रोणा काही दिवसांपूर्वीच आणखी एका गाडीतून सुमारे दोन किलो अमली पदार्थ पकडण्यास मदत केली होती. विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे आणि वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त उदयसिंह पवार यांनी या कामगिरीबद्दल रेल्वे सुरक्षा दलाच्या श्वान पथकातील जवानांचे अभिनंदन केले आहे.

anti narcotics squad arrested three ganja smugglers in Dombivli seizing 30 kg worth Rs 6 lakh
डोंबिवलीत सहा लाखाच्या गांजासह तीन जणांना अटक, मध्यप्रदेशातून रेल्वेतून गांजा डोंबिवलीत
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Three people have been arrested in connection with drug smuggling and production.
सांगलीत मेफेड्रोन उत्पादन करणारा कारखाना उद्ध्वस्त, ३० कोटींचा साठा जप्त, तिघांना अटक
Iron worth 20 lakhs stolen from Metro supervisor Pune print news
पिंपरी: मेट्रोच्या पर्यवेक्षकाकडून २० लाखांच्या लोखंडाची चोरी
debt collectors false case news in marathi
जबरी चोरीचा बनाव करणाऱ्या कर्मचाऱ्याला बेड्या
minor detained for stealing vehicles for fun 5 two wheelers two rickshaws seized
मौजमजेसाठी वाहन चोरी करणारा अल्पवयीन ताब्यात; पाच दुचाकी, दोन रिक्षा जप्त
pune pmp bus driver accident news
पुणे : डंपरच्या चाकाखाली सापडल्याने पीएमपी चालकाचा मृत्यू, वानवडीतील घटना; चालक ताब्यात
thief stealing mobile phones from passengers at swargate st station arrested
एसटी स्थानकात प्रवाशांकडील मोबाइल चोरणारा गजाआड; ४३ मोबाइल संच जप्त
Story img Loader