पुणे : टिळक रस्त्यावर पहाटे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणावर गर्दुल्यांनी कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालाजी यल्लाप्पा आरोटे (वय १९, रा. नांदेड. सध्या रा. हत्ती गणपती, सदाशिव पेठ) याने फिर्याद दिली आहे.  पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पॅरोलवर तुरुंगाबाहेर आला आणि ५० लाखांसाठी पुन्हा तुरुंगात गेला… जाणून घ्या सराईत गुन्हेगारांचा प्रताप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण मूळचा नांदेड जिल्ह्यातील आहे. तो  काही महिन्यांपूर्वी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आलेला आहे.  सदाशिव पेठेतील अभ्यासिकेत तो जायचा. मित्रांसोबत भाड्याची खोली घेऊन  तो रहातो. सदशिब पेठेत अनेक अभ्यासिका आहेत. रात्रीही या अभ्यासिका सुरू असतात. तिघे मित्र अभ्यास करून पहाटे दुचाकीवरून घरी निघाले होते. टिळक रस्त्यावरील एका स्पोर्ट्सच्या दुकानासमोर आल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना अडविले.  एकाने त्याला पकडून बाजूला नेले. त्यानंतर गाडीतील कोयता काढून त्यांच्या डोक्यात वार केला. त्याने वार हुकवला. बालाजी आणि मित्रांनी पोलीस चौकीत धाव घेतली. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drug addict attacked on youths with koyta who preparing for competitive exams pune print news rbk 25 zws
Show comments