ससून रुग्णालयातून पसार झालेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला चेन्नईत मुंबई पोलिसांच्या पथकाने पकडले. त्याला मुंबईतील न्यायालयाने शनिवार, २१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, ललित पाटील या आरोपीला मदत करणाऱ्या प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम या दोन्ही मैत्रिणींना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात हजर केले, त्यावेळी त्या दोघींना २३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ॲड. तेजस पुणेकर आणि ॲड, समीर इनामदार ही आरोपींच्या वकिलांची नावं आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “ईडी अन् सीबीआयचा ससेमिरा संपवायचा असेल, तर…”, पृथ्वीराज चव्हाणांचं विधान

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायाधीश ए. सी. बिराजदार यांना माहिती देताना तपास अधिकारी म्हणाले की, आरोपी ललित पाटील हा २ ऑक्टोबर रोजी पळून गेल्यानंतर त्याला या दोन्ही आरोपींनी २५ लाख रुपयांची मदत केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे एकूणच हे प्रकरण लक्षात घेऊन अधिक तपासासाठी सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

आरोपीचे वकील ॲड. तेजस पुणेकर आणि ॲड. समीर इनामदार यांनी सात दिवसांच्या पोलिस कोठडीला विरोध दर्शविला. त्यावर सरकारी वकील नीलम यादव इथापे यांनीदेखील बाजू मांडली. अखेर न्यायाधीश ए. सी. बिराजदार यांनी सात दिवसांऐवजी चार दिवसांची म्हणजेच २३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.