अमली पदार्थ तस्कर प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील,रोहित चौधरी, शिवाजी शिंदे या तिघा आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयात हजर केल्यावर, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी तिघा आरोपींना 7 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर यावेळी ललित पाटीलच्या जीवाला पोलीसकडुन धोका असल्याचा दावा ललित पाटीलच्या वकिलांनी यावेळी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> अभाविप आणि एसएफआयमध्ये मारामारी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील घटना

अमली पदार्थ तस्कर प्रकरणातील मुख्य ललित पाटीलसह रोहित चौधरी, शिवाजी शिंदे या तीन आरोपींना मुंबई येथून पुणे पोलिसांनी काल ताब्यात घेतले.त्यानंतर या तिघा आरोपींना आज दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांच्या समोर हजर करण्यात आले.        

त्यावेळी मुख्य आरोपी ललित पाटीलसह अन्य आरोपींकडे अधिक चौकशी करण्यासाठी 14 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली. ललित पाटीलच्या जीवाला पुणे पोलिसांकडून धोका आहे. ससून रुग्णालयात ललित पाटील उपचार घेत होता.त्यावेळी त्याला पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती, असा दावा यावेळी ललित पाटीलच्या वकिलांनी यावेळी केला.ललित पाटील आजारी असून त्याच्यावर हर्णीयाची शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याच सांगत ललित पाटीलच्या वकिलांकडून 14 दिवसांच्या पोलीस कोठडीला विरोध दर्शविला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी सरकारी वकील आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद झाल्यावर 7 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drug smuggler lalit patil along with three accused police custody till october 7 svk 88 zws