अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याची सोमवारी मुंबई येथील न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर पुणे पोलिसांनी सर्व प्रक्रिया पार पाडून मुख्य आरोपी ललित पाटील याला ताब्यात घेतले.त्यानंतर मंगळवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास चोख पोलिस बंदोबस्तमध्ये पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात आणण्यात आले आहे.त्यावेळी ललित पाटीलसह तिघांना आर्थररोड कारागृहातून ताब्यात घेण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्य आरोपी ललित पाटील, राहुल चौधरी, शिवाजी शिंदे अशी मुंबई येथुन ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

महिन्याभरापूर्वी ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारवरून तब्बल २ कोटी १४ लाखांचे ड्रग्ज पकडले होते. याप्रकरणी सुभाष मंडल आणि रौफ शेख यांना अटक करण्यात आली होती. या दोघांकडील तपासात एका प्रकरणात अटकेत असलेला आरोपी ललित पाटील हा ससून रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती समोर आली.

हेही वाचा >>> भाजीपाल्याचा कचऱ्याच्या नावाखाली गांजाची वाहतूक; हिंजवडीत ३१ किलो गांजा जप्त

त्यानंतर ललित पाटील हा ससून रूग्णालयातून पळून गेला होता.त्याला पळून जाण्यास त्याचा भाऊ भूषण पाटील, अभिषेक बलकवडे,मैत्रीण प्रज्ञा पाटील, रोझरी स्कुलचा विनय अर्‍हाना, त्याचा चालक डोके यांनी मदत केल्याची माहिती समोर आली.या सर्वांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे.त्याच दरम्यान मुख्य आरोपी ललित पाटील याला साकीनाका पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून अटक केली होती.त्यामुळे ललित पाटील याचा ताबा पुणे पोलिसांकडे केव्हा मिळतो.याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

त्याच दरम्यान मुख्य आरोपी ललित पाटील याची सोमवारी न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर त्याचा ताबा मिळावा,यासाठी पुणे पोलिसांनी मुंबई येथील न्यायालयात अर्ज केला होता.पुणे पोलिसांनी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतर ललित पाटील याचा ताबा पुणे पोलिसांना देण्यात आला.त्यावेळी ललित पाटील सह या प्रकरणी राहुल चौधरी, शिवाजी शिंदे या तिघांना मुंबई येथुन पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात मंगळवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास आणण्यात आले.आता उद्या बुधवारी न्यायालयात ललित पाटील सह अन्य आरोपींना हजर केले जाणार आहे.त्यावेळी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drug trafficker lalit patil along with three accused taken into custody by pune police svk 88 zws
Show comments