पुणे : फॉलकोडिनयुक्त सर्दी-खोकल्याची औषधे आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे समोर आले आहे. या औषधांचा वापर करू नये, अशा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला होता. आता डॉक्टरांनी रुग्णांना या औषधांऐवजी पर्यायी दुसरी औषधे द्यावीत, असे निर्देश औषध महानियंत्रकांनी दिले आहेत. विशेष म्हणजे, या औषधांचा नशेसाठी वापर होत असल्याचा मुद्दा आरोग्यतज्ज्ञांनी अधोरेखित केला आहे.
औषध महानियंत्रक राजीव रघुवंशी यांनी म्हटले आहे की, जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिल्यानंतर फॉलकोडिनयुक्त औषधांचे दुष्परिणाम तपासण्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. सध्या डॉक्टरांनी रुग्णांना फॉलकोडिनयुक्त औषधांऐवजी पर्यायी इतर औषधे द्यावीत. याचबरोबर शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांनी रुग्णाने आधी १२ महिन्यांच्या कालावधीत हे औषध घेतले होते की नाही, याची खातरजमा करावी. यातून त्या रुग्णाच्या जीवाला कोणताही धोका होणार नाही.
हेही वाचा >>> पुणे : रेल्वे प्रवास आणखी सोपा…स्थानकांऐवजी आता लोकप्रिय ठिकाणांच्या नावाचा वापर
जागतिक आरोग्य संघटनेने सर्व जगभरातील डॉक्टर आणि नियामक संस्थांना फॉलकोडिनयुक्त सर्दी-खोकल्याची औषधे धोकादायक असल्याचा इशारा नुकताच दिला होता. संघटनेने म्हटले होते, की फॉलकोडिनयुक्त औषधे घेतलेल्यांनी १२ महिन्यांत शस्त्रक्रिया करतानी डॉक्टरांनी याची कल्पना द्यावी. शस्त्रक्रिया करताना अशा व्यक्तींना सर्वसाधारण भूल दिल्यास त्यांना जीवघेणी ॲलर्जिक रिॲक्शन होऊ शकते. त्यात त्यांचे प्राणही जाऊ शकतात. त्यामुळे डॉक्टरांनी या औषधांचा वापर टाळावा.
कोडिनयुक्त खोकल्याच्या औषधांचा वापर नशेसाठी मोठ्या प्रमाणात होत होता. त्यामुळे त्यावर बंदी आणण्यात आली होती. त्यामुळे नंतर कोडिनचे संयुग असलेल्या फॉलकोडिनयुक्त औषधांचा वापर सुरू झाला. या औषधांमुळे नशा येते आणि हलकेपणाची भावना जाणवते. त्यामुळे अनेकजण त्यांचा वापर करतात. त्यांच्या दीर्घकाळ वापरामुळे आणि जास्त प्रमाणात सेवनामुळे मेंदूला हानी पोहोचते, अशी माहिती आरोग्यतज्ज्ञ अविनाश भोंडवे यांनी दिली.
हेही वाचा >>> पुणे : तांदळाची दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने घेतला हा मोठा निर्णय
फॉलकोडिनयुक्त औषधांचे व्यसन लागते. या औषधांचा नशा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्याचे दीर्घकालीन अनेक दुष्परिणाम आहेत. त्यामुळे ही औषधे घेणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
– डॉ. अविनाश भोंडवे, आरोग्यतज्ज्ञ