पुणे जिल्ह्य़ात पोलिसांनी कारवाई करून जप्त केलेले २३ लाख १४ हजार रुपयांचे अमली पदार्थ शनिवारी नष्ट करण्यात आले. अमली पदार्थाच्या गुन्ह्य़ात न्यायालयाने निकाल दिल्यानंतर हे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले.
पुणे जिल्ह्य़ातील अमली पदार्थ नष्ट करण्यासाठी पुण्याचे सहपोलीस आयुक्त संजीवकुमार सिंघल यांच्या अध्यक्षेतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीचे राज्य गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त, पुणे ग्रामीणचे अधीक्षक आणि लोहमार्ग अधीक्षक सदस्य आहेत. या समितीने निर्णय घेतल्यानंतर शनिवारी २३ लाख रुपयांचे अंमली पदार्थ मुंढवा येथील भारत फोर्ज येथील भट्टीत जाळून नष्ट केला. यामध्ये १९ किलो गांजा, १० किलो चरस, एक किलो चारशे ग्रॅम गांजा मिश्रित अफू असा माल जप्त करण्यात आला आहे.