विमाननगर भागात अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एकास अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्याच्याकडून कोकेन, मोटार, मोबाइल संच असा १५ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.अख्तर नुरलहोदा शेख (वय ३४, सध्या रा. कलवड वस्ती, धानोरी, मूळ रा. मुजफ्फरपूर, बिहार) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शेख विमाननगर भागात मोटारीतून अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.

हेही वाचा >>>पुणे: सिंहगड रस्ता भागात चोर समजून तरुणाचा खून; फरार आरोपी अटकेत

Police seized 70 lakh rupess in suspicious car traveling from mp to Maharashtra
मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनात घबाड
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
10 kg ganja seized in pune
मध्य प्रदेशातून गोव्यात गांजाची तस्करी करणारे गजाआड, खडकी परिसरात कारवाई; दहा किलो गांजा जप्त
Massive pollution due to firecrackers during Diwali
फटाक्यांच्या विषारी धुरामुळे श्वास कोंडला!
pollution level of firecrackers
फटाक्यांच्या प्रदूषणाची पातळी कशी मोजली जाते? प्रदूषकांवर कारवाई करण्याचे अधिकार कोणाला असतात?
FDA seized suspected edible oil and spices worth around Rs two lakh from Ambad and Panchvati
लाखोंचा खाद्यतेल, मसाला साठा जप्त
FDA raided establishments for adulteration seizing food stock worth Rs 311 crore
दिवाळीनिमित्त अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई, ३ कोटी ११ लाखांचा माल जप्त
pistols seized thief Pune, Vishram Bagh police,
पुणे : लूटमार करणाऱ्या चोरट्याकडून दोन पिस्तुलांसह काडतुसे जप्त, विश्रामबाग पोलिसांकडून चोरट्याला अटक

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने विमाननगर परिसरातील कोणार्कनगर सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर थांबला होता. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडून दहा लाख ४२ हजार ४०० रुपये किंमतीचे ५२ ग्रॅम कोकेन, मोटार, रोकड, मोबाइल संच असा १५ लाख ५७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, विशाल शिंदे, योगेश माेहिते, मारुती पारधी, प्रवीण उत्तेकर, विशाल दळवी आदींनी ही कारवाई केली.