पुणे : मद्यपी वाहनचालकांविरुद्ध (ड्रंक अँड ड्राइव्ह) कारवाई करताना मोटारचालकाने महिला पोलीस हवालदाराला फरफटत नेल्याची धक्कादायक घटना बंडगार्डन रस्ता परिसरात मध्यरात्री घडली. मोटारीच्या धडकेत महिला पोलीस हवालदाराला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा >>> भाजपचे नेते विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा अपहरण करून खून

thane drunk driver hit vehicles
घोडबंदर मार्गावर मद्यपी वाहन चालकाची तीन ते चार वाहनांना धडक, कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
accident on Bandra Worli Bridge
दोन वर्षांपूर्वीचा वांद्रे-वरळी सेतूवरील विचित्र अपघात; मानिसक आजाराने ग्रस्त कार चालकाला उच्च न्यायालयाकडून जामीन
Domino Effect Crash Sudden Scooty Brake Causes Multi-Vehicle Pileup Internet Reacts WATCH
“वो स्त्री है कुछ भी कर सकती है…” भररस्त्यात दुचाकीस्वार काकूंनी अचानक मारला ब्रेक, एकमेकांना धडकल्या मागून येणाऱ्या गाड्या, विचित्र अपघाताचा Video Viral
gang created terror in Panmala area on Sinhagad Road
सिंहगड रस्त्यावरील पानमळा परिसरात वाहनांची तोडफोड, दहशत माजविणाऱ्या टोळक्याविरुद्ध गुन्हा
Buldhana, Speeding car hits a vehicle, car ,
बुलढाणा : भरधाव कार वाहनावर आदळली, एक जागीच ठार, दोघे गंभीर…
Rickshaw driver arrested , molesting woman ,
पुणे : प्रवासी महिलेचा विनयभंग करणारा रिक्षाचालक अटकेत
Toddler killed by water tanker in pune
टँकरच्या चाकाखाली सापडून एक वर्षांच्या बालकाचा मृत्यू

दीपमाला राजू नायर असे जखमी झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी विजयकुमार जगताप यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मद्यपी वाहनाचालकांच्या चुकांमुळे शहरात गंभीर स्वरुपाच्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यापार्श्वभूमीवर पोलिसांकडून दररोज नाकाबंदी करुन वाहनचालकांची तपासणी करण्यात येत आहे. बंडगार्डन पोलीस आणि वाहतूक शाखेच्या पथकाने मध्यरात्री बंडगार्डन परिसरातील वेलस्ली रस्त्यावर नाकाबंदी करुन वाहनचालकांची तपासणी सुरू केली. त्यावेळी जहाँगीर रुग्णालयाकडून भरधाव वेगाने निघालेल्या एका मोटारचालकाला महिला पोलीस दीपमाला नायर थांबण्याची सूचना केली.

हेही वाचा >>> पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा

नाकबंदी करणयासाठी लावलेल्या लोखंडी कठड्याजवळ (बॅरीकेट) दीपमाला नायर थांबल्या होत्या. त्यावेळी भरधाव मोटारीने कठड्याला धडक दिली. कठड्याजवळ थांबलेल्या नायर यांना मोटारचालकाने ५० ते ६० मीटर फरफटत नेले. अपघातात नायर यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अपघातानंतर मोटारचालक पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी दिली.

Story img Loader