पुणे : पुणे स्टेशन परिसरात नशेबाज चोरट्यांनी दहशत माजविली असून, पैसे देण्यास नकार दिल्याने एकावर ब्लेडने वार केल्याची घटना घडली. स्टेशन परिसरात आठवडभरात लुटमारीच्या तीन घटना घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षेविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत वडिथा गोविंदा नाईक (वय २८, रा. बिबवेवाडी) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> स्वारगेट भागात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; पोलिसांकडून महिलेला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाईक शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पुणे स्टेशन परिसरातील तुकाराम शिंदे वाहनतळ परिसरातून निघाले होते. त्यावेळी या भागात एकाने त्यांना अडवून पैशांची मागणी केली. नाईक यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर चोरट्याने त्यांच्या खिशातील ८०० रुपये काढून घेतले. त्यांनी चोरट्याला विरोध केला. चोरट्याने त्यांच्यावर ब्लेडने वार केले. नाईक यांनी आरडाओरडा केल्यानंतर चोरटा पसार झाला. सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार नाईक तपास करत आहेत. पुणे स्टेशन परिसरातचोरट्यांनी गुंगीचे ओैषध असलेला रुमाल तरुणाच्या चेहऱ्यावर लावून त्याच्याकडील ४३ हजारांची रोकड चोरून नेली होती. चार दिवसांपूर्वी स्टेशन परिसरात रिक्षाचालक आणि साथीदारांनी चाकणमधील तरुणाला लुटल्याची घटना घडली होती. स्टेशन परिसरात नशेबाज चोरट्यांचा वावर असतो. या भागात प्रवाशांना धमकावून त्यांच्याकडील रोकड, तसेच मोबाइल चोरुन नेल्या जातात.