पुणे : वाहतूक शाखेतील एका सहायक फौजदाराने कर्तव्यावर असताना दारुच्या नशेत वाहनचालकांना शिवीगाळ करुन दंडाच्या नावाखाली पैशांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन सहायक पोलीस फौजदाराला निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिले. प्रेमचंद भानूदास वेदपाठक असे निलंबित करण्यात आलेल्या सहायक फौजदाराचे नाव आहे. वेदपाठक शिवाजीनगर वाहतूक विभागात सहायक फौजदार आहेत.

हेही वाचा >>> पुण्यात पडकलेल्या दहशतवाद्यांचा बॉम्बस्फोट करण्याचा डाव उधळला; ‘एनआयए’च्या तपासात माहिती उघड

motorist, police dragged, barricade, police,
मोटार तपासण्यासाठी थांबविण्यास सांगितल्याने पोलिसाला बॅरिकेटसह २० फुटापर्यंत फरफटत नेले; वाचा कुठे घडली ही घटना
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Follow up of demands to candidates through manifesto from Rickshaw Panchayat before elections
रिक्षाचालकांच्या मागण्या ऐरणीवर! निवडणुकीच्या तोंडावर रिक्षा पंचायतीकडून जाहीरनाम्याद्वारे उमेदवारांकडे पाठपुरावा
pune officers without helmet no entry
पुणे: सावधान ! महापालिकेच्या इमारतीमध्ये हेल्मेट शिवाय प्रवेश कराल तर…!
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल
MLA Rohit Pawar alleged that MLAs gave contracts in Municipal Corporation to their relatives
पिंपरी : चिंचवडमध्ये आमदारांच्या नातेवाइकांचा कंत्राटदार ‘पॅटर्न’; कोणी केला हा आरोप
Pimpri, Female computer operator bribe, computer operator bribe Female, bribe,
पिंपरी : सहाशे रुपयांची लाच घेताना संगणक चालक महिला अटकेत

मॉडेल कॉलनी परिसरात ते वाहतूक नियमन करत होते. कर्तव्यावर असताना त्यांनी दारु प्यायली होती. दंडाच्या नावाखाली त्यांनी वाहनचालकांकडे पैशांची मागणी केली होती. नागरिकांनी या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मोबाइलद्वारे चित्रीकरण केले. एका महिलेने याबाबत शिवाजीनगर वाहतूक विभागात लेखी तक्रार दिली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी वेदपाठक यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. वेदपाठक यांनी पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेऊन त्यांना निलंबित करण्यात आले आहे.