पिंपरी- चिंचवड: मध्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाचा दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना मध्यरात्री दीडच्या सुमारास काळेवाडी परिसरात घडली. याप्रकरणी काळेवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत. अनिकेत प्रल्हाद माने असं २४ वर्षीय तरुणाचं नाव आहे.
अनिकेत हा डिलिव्हरी बॉयचं काम करत होता. रविवारी मध्यरात्री दीड च्या सुमारास मध्यधुंद अवस्थेत रस्त्यावरून जात होता. तेव्हा लघुशंका करत असलेल्या दोन तरुणांशी वाद घातले. त्यांच्या अंगावर जाऊन त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. तरुणांनी त्याला हुसकावून लावले. तो घाबरून इतर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर गेला आणि तो खाली पडला.
अनिकेचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाल्याची माहिती काळेवाडी पोलिसांनी दिली आहे. या घटनेप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांच्या हाती काही सीसीटीव्ही देखील लागले असून त्याचा कोणी घातपात तर केला नाही ना? याचा देखील तपास पोलीस करत आहेत.