लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पूर्ववैमनस्यातून टोळक्याने अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करुन त्याचा खून केल्याची घटना हडपसर भागातील शंकरमठ वसाहतीत घडली. याप्रकरणी तीनजणांसह अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Crime News
Crime News : “मृत्यूनंतर काय होतं?”, गुगलवर सर्च केलं आणि स्वत:वरच झाडली गोळी; ९वीत शिकणाऱ्या मुलाचे धक्कादायक कृत्य
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
murder of youth in Bhusawal, murder Bhusawal,
भुसावळमध्ये तरुणाच्या हत्येनंतर पाच संशयितांना अटक
Youth beaten with knife and koyta in Rahatani Two arrested
पिंपरी : रहाटणीत तरुणाला चाकू, कोयत्याने मारहाण; दोघे अटकेत, तिघांविरोधात गुन्हा
dead body buried
अज्ञात व्यक्तीचा खून करून मृतदेह जमिनीत पुरला, अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील घटना
Father murder by psychopath, Risod Taluka,
अकोला : मनोरुग्णाकडून वडिलांची हत्या, घरातच केले डोक्यावर वार
Bengaluru Crime News
मुलांना विष पाजलं, स्वत:ही केली आत्महत्या; बंगळुरूत दाम्पत्याचं धक्कादायक कृत्य; मरणापूर्वी लिहिला सविस्तर ईमेल!
police arrest two for attacking youths with koyta in bibvewadi
बिबवेवाडीत तरुणांवर कोयत्याने वार; पोलिसांकडून दोघांना अटक

स्वप्नील विठ्ठल झोंबार्डे (वय १७, रा. शंकरमठ परिसर, मिरेकर वस्ती, हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सनी रावसाहेब कांबळे (वय २५), अमन साजिद शेख (वय २२), आकाश हनुमंत कांबळे यांच्यासह अल्पवयीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत विठ्ठल महादेव झोंबार्डे (वय ४६) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आणखी वाचा-पुणे: गणेशभक्तांनी खुशखबर! गणेशोत्सवाच्या काळात मेट्रोच्या वेळेत वाढ; जाणून घ्या नवीन वेळापत्रक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील आणि आरोपी सनी कांबळे यांच्यात काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. आरोपींनी रविवारी (१७ सप्टेंबर) रात्री दहाच्या सुमारास स्वप्नीलला घराबाहेर बोलावले. सार्वजनिक शौचालयाजवळ त्याच्यावर कोयत्याने वार केले. आरोपी कांबळे, शेख आणी साथीदारांनी कोयते उगारुन दहशत माजविली. आमच्या नादाला लागला तर जीवे मारू, अशी धमकी देऊन दहशत माजविली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

Story img Loader