महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी घातलेल्या तारखेच्या अटीमुळे राज्यसेवा परीक्षेच्या मुलाखतीमध्ये काही उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आले आहे. या बाबत उमेदवारांमध्ये नाराजी असून, राज्यसेवेच्या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या नियमानुसारच कार्यवाही केल्याचे स्पष्टीकरण एमपीएससीकडून देण्यात आले.

हेही वाचा- चिंता वाढवणारी बातमी! पुणे विमानतळावर आढळला करोना पॉझिटिव्ह रुग्ण

Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल

एमपीएससीतर्फे राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२१च्या मुलाखतींची प्रक्रिया सुरू आहे. राज्यसेवा २०२१चे अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत २ नोव्हेबर २०२१ होती. त्यामुळे उमेदवारांनी त्यापूर्वीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. मात्र, मुलाखतीवेळी काही उमेदवारांकडून २ नोव्हेंबर २०२१नंतरचे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्यात आले. त्यामुळे एमपीएससीकडून दिलेल्या मुदतीनंतरची प्रमाणपत्रे सादर केलेल्या उमेदवारांची प्रमाणपत्रे अवैध ठरली. परिणामी संबंधित उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आले. दरम्यान, राज्यसेवेच्या जाहिरातीमध्ये सर्व नियम आणि अटी स्पष्टपणे नमूद केलेले होते. त्यानुसारच कार्यवाही करण्यात आल्याचे स्पष्टीकरण एमपीएससीच्या अधिकाऱ्यांनी दिले.

हेही वाचा- “मुक्ता टिळक भाजपाच्या असल्या तरी…”; कसब्यातून पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या रुपाली पाटील-ठोंबरेंना पक्षाकडून घरचा आहेर

पोलीस भरतीसाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपात्रच्या तारखेची अट शासनाने शिथिल केली आहे. २०२१च्या राज्यसेवेच्या जाहिरातींवेळी करोना काळ असल्याने अनेक उमेदवारांना मुदतीत प्रमाणपत्रे उपलब्ध होऊ शकली नाहीत याचा विचार करून, उमेदवारांचे नुकसान होऊ नये दृष्टीने एमपीएससीनेही हा नियम शिथिल करण्याची मागणी एमपीएससी स्टुडंट्स राईटचे महेश बडे यांनी केली.