पुणे : बीएसएनएलच्या ४ जी, ५ जी सेवेची मागणी नागरिक करीत आहेत. मात्र, टीसीएस कंपनीकडून या सेवेसाठी आवश्यक उपकरणे बीएसएनएलला अद्याप मिळालेली नाहीत. यामुळे बीएसएनएल देशाच्या नागरिकांना ४ जी, ५ जी सेवा देण्यास कमी पडत आहे. केंद्र सरकारकडूनही यात दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनने देशभरात आंदोलन सुरू केले आहे. पुण्यातही संघटनेच्या वतीने मंगळवारी आंदोलन करण्यात आले.

बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन समन्वय समितीच्या वतीने सातारा रस्त्यावरील बीएसएनएल कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी बीएसएनएलला लवकरात लवकर ४जी, ५ जी उपकरणे देण्याची मागणी करण्यात आली. संघटनेचे पुणे अध्यक्ष एम.आय. जकाती म्हणाले की, केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत म्हणून फक्त बीएसएनएलला देशात बनविलेली ४ जी उपकरणे वापरण्याची परवानगी दिली. मोबाईल सेवा पुरवठादार इतर सर्व कंपन्या चीन आणि दक्षिण कोरियातील कंपन्यांची ४ जी उपकरणे वापरत आहेत. बीएसएनएलच्या व्यवस्थापनाने नाईलाजाने टीसीएस कंपनीसोबत ४ जी उपकरणे बनवण्यासाठी करार केला. परंतु, तीन वर्षे होऊनही टीसीएसने ४ जी उपकरणे बनविलेली नाहीत. आता टीसीएस कंपनी चीनमधील झेडटी कंपनीकडे ४ जी उपकरणे विकसित करण्यासाठी मदत मागत आहे. टीसीएस कंपनी बीएसएनएलला ४ जी उपकरणे देण्यास असमर्थ ठरली आहे.

Office Space, Pune, Mumbai, Delhi,
कार्यालयीन जागा सहकार्यात पुण्याचा झेंडा! मुंबई, दिल्लीला मागे टाकत देशात दुसऱ्या स्थानी झेप
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
pune municipal corporation create email address for complaints regarding water issues
समाविष्ट गावातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसाठी पालिकेने घेतला हा निर्णय !
Dnyanradha Multi State Co Operative Credit Society, fraud case, ED
ईडीकडून ३३३ कोटींच्या मालमत्तेवर टाच
house lottery application, deadline, Navi Mumbai,
घरे सोडत अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढीची मागणी, आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी दिलेली मुदत अपुरी असल्याचे अनेकांचे मत
mmc created special app to curb bogus doctors and to inform citizens about registered doctors
क्यूआर कोडद्वारे डॉक्टरांची ओळख पटवणे सोपे ! नोंदणीकृत सदस्यांची वैद्यक परिषदेच्या ॲपवर नोंदणी
Bank of baroda recruitment 2024 bank of baroda is conducting the recruitment for 592 Vacancies
BOB Recruitment 2024: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; ५९२ जागांसाठी अर्ज करा अन् घ्या घसघशीत पगार
constitution of india
संविधानभान: जिसकी जितनी हिस्सेदारी…

हेही वाचा… मेट्रोच्या श्रेयवादावरून मोहोळ- धंगेकर यांच्यात खडाजंगी

नागरिक बीएसएनएलच्या ४ जी व ५ जी सेवेची मागणी करीत आहेत. ही सेवा देण्यासाठी आवश्यक उपकरणे न मिळाल्यामुळे बीएसएनएल देशाच्या नागरिकांना ही सेवा देण्यात कमी पडत आहे. त्यामुळे सरकारने बीएसएनएलला लवकरात लवकर ४ जी व ५ जी उपकरणे द्यावीत अथवा सरकारचा समभाग हिस्सा असलेल्या वोडाफोन कंपनीची उपकरणे वापरण्याची परवानगी बीएसएनएलला द्यावी. सरकारने तातडीने पाऊल उचलल्यास बीएसएनएल नागिकांना स्वस्त दरात ४ जी, ५ जी सेवा देऊ शकेल, असे जकाती यांनी सांगितले. या आंदोलनात नागेशकुमार नलावडे, संदीप गुळूंजकर, किशोर गवळी, बबन सूर्यवंशी, मंजुषा लचके यांनी भूमिका मांडली. विकास कदम यांनी सूत्रसंचालन तर गणेश भोज यांनी आभार मानले.

हेही वाचा… पुणे: सासरच्या त्रासाला कंटाळून तरूणाची आत्महत्या

बीएसएनएलची ४ जी व ५ जी सेवा नसल्याने ग्राहक कमी होऊन कंपनीच्या तोट्यात वाढ होत आहे. खासगी कंपन्या पुढे जाण्यासाठी बीएसएनएलचे जाणून बुजून खच्चीकरण केले जात आहे. – एम.आय. जकाती, अध्यक्ष, बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन पुणे