पुणे : प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात मंगळवारी (९ जुलै) रोजी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने पुणे शहरासह जिल्ह्यातील बारावीपर्यंतच्या सर्व शाळांना ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
हेही वाचा – ठाण्यातील शाळा, महाविद्याल्यांना उद्या सुट्टी जाहीर; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा निर…
अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये, तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये या दृष्टीने जिल्ह्यातील बारावीपर्यंतच्या सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी राहील. मात्र, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाऊ नये. आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.