लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: पतीच्या टोमण्यांमुळे हदयविकाराचा त्रास झाल्याची तक्रार एका महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. पतीसह नातेवाईकांनी शारिरिक आणि मानसिक छळ केल्या प्रकरणी पोलिसांनी पतीसह नातेवाईकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आणखी वाचा- पुणे: मासिक पाळीत महिलेशी अघोरी कृत्य, जादुटोणा कायद्यान्वये पतीसह नातेवाईकांवर गुन्हा
या प्रकरणी प्रतीक चोथे, सासरे दिलीप चोथे, अंजली क्षीरसागर, वैशाली शिंदे, विद्या भगत, रुपाली तोडमल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आरती चोथे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरती आणि प्रतीक यांचा २०२१ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर आरतीला छळ सुरु करण्यात आला. टोमणे मारण्यात आले. तिला मारहाण करण्यात आले. छळामुळे हदयविकार झाल्याचे आरती यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस नाईक यादव तपास करत आहेत.