लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : मागणी वाढल्याने गवार, कोबी, वांगी, भुईमुग शेंग, मटारच्या दरात वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

Pimpri Vidhan Sabha, Sharad Pawar candidate,
पिंपरी विधानसभा : ठाकरेंच्या शिवसैनिकांनी बंडाचा इशारा दिल्यानंतर शरद पवारांच्या उमेदवार काय म्हणाल्या? वाचा..
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Former corporator of NCP Ajit Pawar group Nana Kate will contest as an independent
पिंपरी : चिंचवडमध्ये महायुतीत बंडखोरी, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नाना काटे अपक्ष लढणार
Economic decline state government Sharad Pawar Vijay Wadettiwar criticize the government
आर्थिक घसरणीवरून राज्य सरकार लक्ष्य! शरद पवार, विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Satej Patil On Madhurima Raje
Satej Patil : “दम नव्हता तर उभं राहायचंच नव्हतं ना…”, काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने सतेज पाटील संतापले
Gutkha worth one crore seized in Khed Shivapur toll naka area
खेड शिवापूर टोलनाका परिसरात एक कोटींचा गुटखा जप्त, कर्नाटकातील गुटख्याची पुण्यात विक्री
AMit Thackeray Prasad lad
“भाजपा अमित ठाकरेंचाच प्रचार करणार”, प्रसाद लाडांकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले, “सरवणकरांना विधान परिषदेवर…”

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून मिळून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून ८ ते १० टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून प्रत्येकी ३ ते ४ टेम्पो कोबी, कर्नाटकातून २ टेम्पो पावटा, कर्नाटक आणि गुजरातमधून ३ ते ४ टेम्पो घेवडा, आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून मिळून ३ ते ४ टेम्पो शेवगा, मध्य प्रदेशातील इंदूर भागातून ५ ते ६ टेम्पो गाजर, गुजरातमधून ३ टेम्पो भुईमूग शेंग, मध्य प्रदेशातून ८ ते १० टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

आणखी वाचा-पिंपरी : चिंचवडमध्ये महायुतीत बंडखोरी, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नाना काटे अपक्ष लढणार

पुणे विभागातून सातारी आले ४०० ते ५०० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो दहा ते अकरा हजार पेटी, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, ढोबळी मिरची ७ ते ८ टेम्पो, पुरंदर, पारनेर, वाई, सातारा परिसरातून मटार ४० ते ५० गोणी, काकडी ७ ते ८ टेम्पो, कोबी ३ ते ४ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, कांदा १०० ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून ५० ते ६० टेम्पो बटाट्याची आवक झाली.

कोथिंबीर, मेथी, शेपू, पालकच्या दरात वाढ

कोथिंबीर, मेथी, शेपू, पालक, चाकवत, करडई, चाकवत या पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली. कांदापात, पुदिना, अंबाडी, मुळे, राजगिरा, चुका, चवळईचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबीर एक लाख जुडी, तसेच मेथीच्या ३० हजार जुडींची आवक झाली. घाऊक बाजारात कोथिंबिर आणि मेथीच्या जुडीमागे पाच रुपयांनी वाढ झाली. पालक, शेपू, चाकवत आणि करडईच्या जुडीमागे दोन ते तीन रुपयांनी वाढ झाली.

आणखी वाचा-पुणे : सायबर चोरट्यांकडून महिलांची ४६ लाखांची फसवणूक

घाऊक बाजारात पालेभाज्यांचे शेकड्याचे दर पुढीलप्रमाणे – कोथिंबीर- १५०० ते २५००, मेथी – २५०० ते ३०००, शेपू – ८०० ते १५००, कांदापात- १००० ते १५००, चाकवत – ६०० ते १०००, करडई- ५०० ते ८००, पुदिना – ५०० ते १०००, अंबाडी – ५०० ते ८००, मुळे – ८०० ते १५००, राजगिरा- ४०० ते ७००, चुका – ५०० ते ८००, चवळई- ३००-७००, पालक- १०००-१५००.

लिंबू, पेरुच्या दरात घट

लिंबू आणि पेरूच्या दरात घट झाली. मोसंबी, पपई, खरबूजच्या दरात वाढ झाली. अननस, डाळिंब, संत्री, चिकू, कलिंगड, सीताफळाचे दर स्थिर असल्याची माहिती फळबाजारातील व्यापाऱ्यांनी दिली. फळबाजारात रविवारी मोसंबी ५० ते ६० टन, संत्री २५ ते ३० टन, डाळिंब ४० ते ५० टन, पपई ५ ते ६ टेम्पो, लिंबे दीड ते दोन हजार गोणी, कलिंगड ३ ते ४ टेम्पो, खरबूज ३ ते ४ टेम्पो, चिकू एक हजार गोणी, पेरू एक हजार ते १२०० प्लास्टिक जाळी (क्रेट), अननस ५ ट्रक, सीताफळ ४० ते ५० टन अशी आवक झाली.

Story img Loader