आळंदी मध्ये कुटुंब कर्जबाजारी झाल्याने महिला आत्महत्या करण्यासाठी इंद्रायणी नदीत उतरली. ती मृत्यूची वाट पाहत बसली होती. त्या महिलेला नागरिकांनी तात्काळ नदी पात्राच्या बाहेर काढल्याने तिचा जीव वाचला आहे. आळंदी पोलिसांनी या घटनेनंतर संबंधित महिलेला समजावून सांगून घरी पाठवून दिल आहे. ही घटना रात्री आठ ते नऊ च्या दरम्यान घडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंब कर्जबाजारी झाल्याने महिला इंद्रायणी नदीत आत्महत्या करण्यासाठी उतरली होती. महिला नदीपात्रात बसून पाण्याच्या प्रवाहाची वाट पाहत होती. सुदैवाने पाण्याचा प्रवाह न वाढल्याने महिलेला वन्यजीव रक्षक संस्थेच्या सदस्य आणि तेथील नागरिकांनी सुखरूप नदीपात्रा बाहेर काढल आहे. याबाबत आळंदी पोलिसांनी महिलेला पोलीस ठाण्यात नेऊन तिच्या कुटुंबीयांना बोलावून योग्य ती समज दिली. महिलेच्या कुटुंबावर कर्जाचा बोजा असल्याने महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. इंद्रायणी नदीत बसून वाहत्या पाण्यात त्या वाहून जाण्याची प्रतीक्षा करत होत्या. सुदैवाने पाण्याचा प्रवाह न वाढल्याने तेथील नागरिकांनी त्यांना पाहताच नदीपात्राच्या बाहेर सुखरूप काढले आहेत. गेल्या काही दिवसांपासून आळंदीतील इंद्रायणी नदीमध्ये आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढल आहे. यात बहुतांश महिला आणि तरुणींचा सहभाग आहे.