काेजागरी पौर्णिमेनिमित्त दुधाच्या मागणीत मोठी वाढ झाल्याने घाऊक दूध बाजारात एक लिटर दुधाला ८३ रुपये असा उच्चांकी भाव मिळाला. गणेश पेठेतील दूध बाजारात (दूध भट्टी) दोन हजार लिटर दुधाची आवक झाली.अरण्येश्वर, खडकी, लष्कर, मुंढवा येथील गवळीवाडा तसेच नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई, वाघोली, केसनंद परिसर, भोर, वेल्हा, नसरापूर येथून दुधाची आवक झाली. घाऊक दूध बाजारात १८ लिटर दुधाच्या घागरीला १५०० रुपये असा भाव मिळाला. गेल्या वर्षी १८ लिटरच्या घागरीला १३०० रुपये असा भाव मिळाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>पुणे : जिल्ह्यात १२९ जणांना नव्याने करोना संसर्ग

कोजागरीमुळे दुधाच्या मागणीत वाढ झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत दुधाची आवक कमी झाली आहे, अशी माहिती गणेश पेठेतील दूध बाजार खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष रामदास काळे आणि उपाध्यक्ष दामोदर हिंगमिरे यांनी दिली.सार्वजनिक मंडळे, विविध संस्था-सोसायट्यांकडून सार्वजनिक स्वरूपात काेजागरी पौर्णिमा साजरी केली जाते. मंडळे, संस्था, सोसायट्यांकडून दुधाला मागणी वाढली आहे. डेअरी चालकांकडून दुधाला चांगली मागणी असून रविवारी (९ ऑक्टोबर) दुधाच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी नमूद केले.