पुणे: पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील वीजपुरवठा खंडित झाल्याने महापालिकेची सर्व्हर यंत्रणा सोमवारी कोलमडली. मिळकतकर भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने ऑनलाइन कर भरताना महापालिकेचे संकेतस्थळही क्रॅश झाले. त्यामुळे मिळकतधारकांना मनस्ताप सहन करावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चालू आर्थिक वर्षातील मिळकतकर भरण्याचा सोमवार शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अनेक मिळकतधारकांनी ऑनलाइन पद्धतीने कर भरण्याचा प्रयत्न केला. तसेच मुख्य इमारतीबरोबरच क्षेत्रीय कार्यालये आणि नागरी सुविधा केंद्रातही मिळकतधारकांनी मोठी गर्दी केली होती.ऑनलाइन यंत्रणा कोलमडल्याने मिळकतधारकांनी नागरी सुविधा केंद्रात गर्दी केली. त्यामुळे नागरी सुविधा केंद्रात मोठ्या रांगा लागल्या होत्या. मात्र विद्युत पुरवठा खंडित झाल्याने कामकाज ठप्प झाले. त्याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या. दरम्यान, काही तांत्रिक कारणांमुळे कामकाज ठप्प झाले आहे. यंत्रणा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>>पुणे : दूध दरवाढीच्या धोरणातील चुकीमुळे शेतकऱ्यांचा तोटा

हेही वाचा >>>डाळी वगळता अन्य पिकांच्या पेरण्यांनी सरासरी गाठली

मुदतीमध्ये मिळकतर भरणा-या मिळकतधारकांना सर्वसाधारण करात किमान पाच ते कमाल दहा टक्क्यापर्यंतची सवलत दिली जाते. आतापर्यंत महापालिकेच्या तिजोरीत एक हजार शंभर रुपये जमा झाले आहेत. यंदा मिळकतकरातील चाळीस टक्क्यांची सवलत देण्याच्या निर्णयावरू गोंधळ झाला होता. त्यामुळे यंदा मिळकतकराची देयके विलंबाने पाठविण्यात आली. गेल्या वर्षाही मिळकतर भरण्याची यंत्रणा कोलमडली होती. यावेळीही हाच प्रकार घडला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to server down of pune municipal corporation difficulties in payment of income tax apk 13 amy
Show comments