लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: वडगाव जलकेंद्र आणि राजीव गांधी पंपिंग येथे विद्युत आणि स्थापत्यविषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम येत्या गुरुवारी (१३ जुलै) करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी हिंगणे, आनंदनगर, वडगावसह दक्षिण भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सोमवार (१० जुलै ) ते बुधवार (१२ जुलै) तसेच शुक्रवार (१४ जुलै) ते रविवारी (१६ जुलै) या कालावधीत नियमित पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Offense against speaker along with organizer due to offensive statements
आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वक्त्यासह आयोजकावर गुन्हा
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Narendra Modi statement that Congress wants to end OBC reservation
काँग्रेसला ओबीसी आरक्षण संपवायचे -मोदी
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच

शहरात आठवड्यातील दर गुरुवारी पाणीबंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर तांत्रिक कारणांमुळे दक्षिण पुण्यासाठी पाणीकपातीचे स्वतंत्र वेळापत्रक करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार प्रत्येक दिवशी कोणत्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार, याचे नियोजन करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे या भागाला काही कालावधीत नियमित पाणीपुरवठा होणार आहे. त्यानंतर सोमवारपासून (१७ जुलै) यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

हेही वाचा… पिंपरी-चिंचवडमधील तीन टोळ्यांवर ‘मोक्का’

हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग दोन, आंबेडकर नगर, टिळकनगर, दाते बसस्थानक परिसर या वडगाव जलकेंद्रा अंतर्गत भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहील. तसेच राजीव गांधी पंपिंग अंतर्गत सच्चाई माता टाकी, संतोषनगर, दत्तनगर,सुंदा माता मंदिर, वंडर सिटी, मोरेबाग, श्रीहरी टाकी, बालाजी नगर, पवार रुग्णालय परिसर, केदारेश्वर टाकी, सुखसागरनगर एक आणि दोन, राजेश सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, सुंदरबन सोसायटी, शेलार मळा, कात्रज गावठाण, भारत नगर, दत्तनगर, वरखडे नगर, येवलेवाडी परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (१४ जुलै) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेकडून कळविण्यात आले आहे.