धोधो बरसणाऱ्या परतीच्या पावसामुळे राज्यातील दीड लाख हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहेत.खरीप हंगामातील काढणीला आलेली पिके अक्षरक्ष: पाण्यावर तरंगत आहेत. सोयाबीन, कापूस, तूर, बाजरी, पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या परतीच्या पावसाचा आठरा जिल्ह्यांना फटका बसला असून, नगरसह वऱ्हाडातील अकोला, अमरावती, बुलडाणा आणि यवतमाळला सर्वाधिक फटका बसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक शिंदे गट आणि भाजपा एकत्र लढवणार?

कृषी विभागाने नजरअंदाजानुसार दिलेल्या नुकसान अहवालानुसार ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून बुधवार, १९ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील अठरा जिल्ह्यांना परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. सर्वाधित नुकसान नगर जिल्ह्यात झाले असून, ४६,०३० हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहेत. वऱ्हाडातील अकोला जिल्ह्यात ४१,१८०, अमरावतीत १५,८१०, बुलढाण्यात १२,०६२, वाशिममध्ये ३,१२३ सोलापुरात ११,१०१, पुण्यात ८,१४५, कोल्हापुरात ९९५ आणि गोंदियात ७७२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

पांढऱ्या सोन्याचा झाला लगदा
विदर्भ, वऱ्हाड, खानदेश आणि मराठवाड्यात कापसाचे क्षेत्र मोठे असते. सध्या कापसाची वेचणी सुरू आहे. पावसाळी वातावरण असल्यामुळे वेचणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. तरीही मोठ्या प्रमाणावर कापूस अजून शिवारात आहे. पावसामुळे हा वेचणीला आलेल्या कापसाचा लगदा झाला आहे. भिजलेला कापूस पिवळा पडतो. जमिनीजवळचा कापूस पाण्यात भिजून कुजून जातो. कापसाची प्रत, दर्जा खालावल्यामुळे दरही कमी मिळतो. मुसळधार पावसामुळे कापसाच्या शेतात पाणी साचले असून, शेतकरी गुडघाभर पाण्यात उतरून कापूस वेचणी करत आहेत. पुढील चार-पाच दिवस पाऊस असाच सुरू राहिल्यास कापसाची वेचणीच करता येणार नाही, अशी माहिती परभणी येथील शेतकरी माणिक रासवे यांनी दिली.

हेही वाचा >>>पुणे : दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेले महाग ; किलोमागे दहा रुपयांनी वाढ

सोयाबीनला फुटले कोंब
राज्यभरात सोयाबीन पिकाची काढणी सुरू आहे. काढणीला आलेले सोयाबीनचे पीकच पाण्यात बुडाले आहे. सलग तीन-चार दिवस सोयाबीन पाण्यात राहिल्याने सोयाबीन काळे पडले आहे. कुजले आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनच्या दाण्याला कोंब फुटले आहेत. सोयाबीन पूर्णपणे वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दर्जा खालवण्यासह दरातही मोठा फटका बसणार आहे. सोयाबीनचे पीकच अनेक ठिकाणी पाण्याखाली असल्यामुळे शेतातून पाणी निघून जाईपर्यंत सोयाबीनचे पीकही हाताबाहेर जाणार आहे.

या पिकांना बसला फटका

वऱ्हाडात तूर, कापूस, सोयाबीन. विदर्भात भात. पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीन, भुईमूग, मूग, मका, हळद, बाजरी, तूर, भाजीपाला आणि फळपिके. खानदेशात सोयाबीन, कापूस, केळी, भाजीपाला पिके. कोकणात भात आणि नाचणी पिकाचे नुकसान झाले आहे.