लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमी झाली आहे. मटार, तोतापुरी कैरीच्या दरात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. ढोबळी मिरची, शेवग्याच्या दरात घट झाली असून अन्य फळभाज्यांचे दर स्थिर आहेत. तर कोथिंबीर, मेथीच्या दरात वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

Traders reported that price of coriander decreased compared to last week and price of fenugreek is on rise
कोथिंबिरेच्या दरात घट; मेथी तेजीत, फळभाज्यांचे दर स्थिर
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
wpi inflation hits 4 month high in october on rising food prices
भाज्यांमधील किंमतवाढ ६३.०४ टक्क्यांवर; घाऊक महागाई दराचाही चार महिन्यांतील सर्वोच्च स्तर
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
loksatta editorial on inflation
किरकोळ महागाई दराने गाठला १४ महिन्यांचा उच्चांक; ऑक्टोबर महिन्यात ६.२१ टक्क्यांची नोंद
The Meteorological Department has given the forecast of rain in the state of Maharashtra
थंडी सुरू झाली नाही की आता पाऊस येऊन धडकणार…राज्यातील या भागात…
In Vashis APMC market vegetable prices dropped due to increased arrivals
आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात घसरण

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (१६ एप्रिल) राज्य, तसेच परराज्यांतून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गेल्या आठवड्यात फळभाज्यांची आवक जास्त झाली होती. गुजरात, कर्नाटकमधून मिळून ६ ते ७ टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, कर्नाटकमधून मिळून ३ ते ४ टेम्पो कोबी, राजस्थानातून १ टेम्पो गाजर, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडूतून ३ ते ४ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून २ टेम्पो घेवडा, हिमाचल प्रदेशातून १ टेम्पो मटार, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातून मिळून तोतापुरी कैरी ४ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून १४ ते १५ ट्रक लसूण, आग्रा, इंदूर, तसेच पुणे विभागातून मिळून ४० ट्रक बटाटा आवक झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.

आणखी वाचा-पुणे: अंदमान-निकोबार सहलीसाठी पैसे घेऊन १५ जणांची फसवणूक; पर्यटन कंपनीच्या संचालकांवर गुन्हा

पुणे विभागातून सातारी आले ७०० ते ८०० गोणी, टोमॅटो ९ ते १० हजार पेटी, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, काकडी ८ ते १० टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, मटार १०० गोणी, कांदा १०० ते ११० ट्रक अशी आवक झाली.

कोथिंबीर, मेथीच्या दरात वाढ

अवकाळी पावसामुळे मार्केट यार्डातील तरकारी विभागात गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक कमी झाली. मेथी आणि कोथिंबिरीच्या शेकड्या जुड्यांमागे ३०० ते ४०० रुपयांनी वाढ झाली. अन्य पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. किरकोळ बाजारात कोथिंबिरेच्या एका जुडीला २० ते ३० रुपये दर मिळाले. अन्य पालेभाज्यांच्या जुडीची १५ ते २० रुपये दराने विक्री केली जात असल्याची माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. तरकारी विभागात कोथिंबिरीच्या एक लाख जुडींची आवक झाली. तसेच मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली.

लिंबू, चिकूच्या दरात घट

फळ बाजारात लिंबे, आणि चिकूच्या दरात घट झाली असून, खरबूज, पपई, संत्र्याच्या दरात वाढ झाली आहे. अन्य फळांचे दर स्थिर आहेत. केरळमधून ६ ट्रक अननस, संत्री १५ ते २० टन, मोसंबी ३० ते ४० टन, डाळिंब ३० ते ३५ टन, पपई ७ ते ८ टेम्पो, लिंबे १२०० ते दीड हजार गोणी, कलिंगड ८ ते १० ट्रक, खरबूज ७ ते ८ ट्रक , पेरू २०० ते ३०० प्लॅस्टिक जाळी (क्रेट्स), चिकू दीड हजार डाग, पपई ७ ते ८ टेम्पो अशी आवक झाली.

आणखी वाचा- कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या ‘क्रिप्टोबिझ’च्या संचालकासह दोघे अटकेत

मासळी, मटण, चिकनचे दर स्थिर

गणेश पेठेतील मासळी बाजारात पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरुन मासळीची आवक होत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत पापलेट, रावस, हलवा या मासळीच्या दरात अल्पशी वाढ झाली. मागणी अभावी गावरान अंड्यांच्या दरात शेकड्यामागे ४० रुपयांनी घट झाली आहे. इंग्लिश अंड्यांच्या दरात शेकड्यामागे पाच रुपयांनी वाढ झाली आहे. मटण, चिकनचे दर स्थिर आहेत. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळी १० ते १५ टन, खाडीतील मासळी २०० ते ३०० किलो, नदीतील मासळी ५०० ते ७०० किलो तसेच आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळीची मिळून १५ ते २० टन आवक झाली.