पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालख्यांच्या पुणे मुक्कामावेळी यंदा शहराला चोवीस तास पाणीपुरवठा होण्याबाबत साशंकता आहे. त्यामुळे पालखी सोहळ्याला पाणीटंचाईचा फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी प्रकल्पातील पाणीसाठा कमी असल्याने दोन दिवस चोवीस तास पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याऐवजी टँकरची संख्या वाढवून पाणीपुरवठा करण्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या विचाराधीन आहे. मात्र त्याबाबतचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> जालना : सोसायटी निवडणुकीत काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल पराभूत

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस दाखल झाला असला तरी अद्याप तो सक्रिय झालेला नाही. त्यातच वाढत्या उन्हामुळे पिण्याच्या पाण्याची मागणीही वाढली आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाण्याची शक्यता आणि तशी चाचपणी प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे.

हेही वाचा >>> ‘जे बाळासाहेबांचे विचार विसरले तेच आघाडीच्या उमेदवाराला मतदान करतील,’ सुधीर मुनगंटीवार यांचे विधान

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या येत्या बुधवार आणि गुरुवार (२२ जून, २३ जून) रोजी पुणे मुक्कामी आहेत. त्यानंतर शुक्रवारी (२४ जून) पालख्यांचे प्रस्थान होईल. पालखी मुक्कामी असताना दहा ते बारा लाख वारकरी पुण्यात दाखल होतात. वारकऱ्यांना विविध आरोग्यविषयक सुविधा देताना महापालिकेकडून पालख्या मुक्कामी असताना चोवीस तास पाणीपुरवठा केला जातो. गेल्या दोन वर्षांचा अपवाद वगळता यापूर्वी पालखी मुक्कामावेळी चोवीस तास अखंड पाणीपुरवठा करण्यात आला होता. तसेच खडकवासला साखळी प्रकल्पातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जातो. यंदा मात्र पाणीटंचाईचा फटका पालखी मुक्कामाला बसण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा >>> “तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते की आईचं दूध विकणारा…”, उद्धव ठाकरेंनी सांगितली ‘ती’ आठवण!

खडकवासला साखळी प्रकल्पातील चारही धरणातील पाणीसाठी कमी झाला असून तो तीन अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा आहे. अद्याप मान्सून सक्रिय झालेला नाही. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्याचे पंधरा जुलै पर्यंतचे नियोजन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. शहराची पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन महापालिकेकडून प्रतिदिन १ हजार ६०० दशलक्ष लिटर (एमएलडी) एवढे पाणी घेतले जात आहे. त्यानंतरही शहराच्या अनेक भागांना विस्कळीत आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन यंदा चोवीस तास पाणीपुरवठा होण्याबाबत साशंकतता आहे.

हेही वाचा >>> मिस्टर फडणवीस नुसती कट कारस्थानं करुन राज्य चालवता येत नाही – संजय राऊत

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी महापालिका पाण्याचे वीस टँकर पंढरपूरपर्यंत पाठविणार आहे. मात्र पुणे मुक्कामावेळी दैनंदिन वेळेपेक्षा थोडा जास्त काळ पाणी सोडण्यात येणार आहे. पालख्यातील दिंड्या ज्या ठिकाणी वास्तव्यास असतील तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजित आहे. काही भागात तात्पुरती नळजोड उभारण्याचेही नियोजित आहे. अनेक ठिकाणी टँकरची संख्या वाढविण्यात येणार आहे. मात्र त्याबाबतचा अंतिम निर्णय झालेला नसून तो येत्या दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to water shortage pune municipal corporation decided water supply by tanker during palkhi ceremony pune print news prd
Show comments