लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : भरधाव डंपरने दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक दिल्याची घटना नगर रस्त्यावर घडली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाला. अपघातानंतर डंपरचालक पसार झाला असून, लोणीकंद पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

श्रीचंदना विश्वनाथ हेक्टम (वय ३२ ,रा. न्याती इलॉन, वाघोली, मूळ रा. आंध्र प्रदेश) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार विश्वनाथ गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार हेक्टम दाम्पत्य रविवारी सकाळी बॅडमिंटन खेळायला गेले होते. सकाळी दहाच्या सुमारास बॅडमिंटन खेळून हेक्टर दाम्पत्य घरी निघाले होते. नगर रस्त्यावर चितळे मिठाई दुकानासमोर भरधाव डंपरने दुचाकीस्वार हेक्टर दाम्पत्याला धडक दिली. डंपरच्या चाकाखाली सापडून श्रीचंदना यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपरचालक पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या डंपरचालकाचा शोध घेण्यात येत आहे.

आणखी वाचा-बोपदेव घाट सामुहिक बलात्कार प्रकरणात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर

नगर रस्त्यावरील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. मालवाहू अवजड वाहने नगर रस्त्यावरुन जातात. अवजड वाहनांच्या भरधाव वेगामुळे गंभीर स्वरुपाच्या अपघाताच्या घटना घडतात.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dumper hit a two wheeler couple on the city road female passenger died pune print news rbk 25 mrj