निवडणूक प्रचाराची धामधूम संपली आणि आता उद्या मतदानाचा दिवस आलाही. पुण्यापुरते बोलायचे, तर प्रचाराची धामधूम खरेच होती का, असा प्रश्न पडावा, इतकी या वेळची निवडणूक थंड वाटली. पंतप्रधानांसह सर्व पक्षांतील काही महत्त्वाच्या नेत्यांच्या सभा झाल्या खऱ्या, पण त्या उपचारांपुरत्या, असा सूर पुणेकरांत उमटलेला आहे. सभांत नेते काय बोलणार, यापेक्षा, ‘बाप रे, म्हणजे आज अमुक भागात अधिकची वाहतूक कोंडी होणार! कार्यालयातून लवकर निघालेले बरे किंवा घरून काम केलेले उत्तम,’ अशा संवादांची देवाण-घेवाण अधिक झाली. या संपूर्ण प्रचारकाळात सामान्य पुणेकरांत आणखीही बरेच संवाद रंगले होते आणि त्यावर प्रतिक्रियाही उमटत होत्या. निवडणूक प्रचार संपताना त्यांचीही दखल घ्यायला हवी.

‘एकाने घोषित केलेल्या ‘मोफत’च्या योजनेला उत्तर म्हणून दुसऱ्याने जाहीर केलेल्या ‘फुकट’च्या योजनांसाठी आम्हा करदात्यांचा पैसा का? बरे, त्या बदल्यात आम्हाला चांगले रस्ते, उत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, वाहतूक कोंडीतून सुटका, सुरक्षिततेची हमी इत्यादी काही मिळणार असेल, तर ठीक. पण, त्याबाबतही बोलायला कोणी तयार नाही,’ ही त्यातील एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया, तर, ‘आम्ही काय देणार, या राजकारण्यांच्या आश्वासनांच्या खैरातीत दर सणा-उत्सवाला काढल्या जाणाऱ्या मिरवणुकांमुळे होणारा वाहतुकीचा बट्ट्याबोळ होणार नाही याची ग्वाही देऊ, डोके उठविणाऱ्या ध्वनिवर्धकांच्या भिंतींचा योग्य बंदोबस्त करू, धरणे काठोकाठ भरली आहेत, तर सगळीकडे पाण्याचे समान वितरण होईल, याची काळजी घेऊ, बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्या मस्तवाल वाहनचालकांच्या मुसक्या आवळू, खड्डे-मलमपट्टी-पुन्हा खड्डे हे आवर्तन कायमचे थांबवू, नदी पात्रातून वाहिली, तरी पूर येतो, हे होऊ देणार नाही, अनधिकृत बांधकामांना चाप लावू, टेकड्या, मुळात राहतील आणि त्या हिरव्यागारही राहतील, याची दक्षता घेऊ, पदपथांवर चालण्याचा आनंद देऊ… अशी आश्वासने का नसतात,’ अशी प्रश्नांची बरसात करणारा हा आणखी एक मासलेवाईक प्रतिध्वनी!

अरविंद केजरीवाल आणि 'आप'ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं? (फोटो सौजन्य पीटीआय)
अरविंद केजरीवाल आणि ‘आप’ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं?
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
article about social and political polarization facing by american media
वृत्तवाळवंट सुफलाम करण्यासाठी…
maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
Pankaja Munde
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Hemlata Patil
Hemlata Patil : काँग्रेसला मोठा धक्का? ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील पक्ष सोडणार?
भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?

आणखी वाचा-कचरा गोळा करण्यासाठी रात्रीही हवी याची सुविधा!

निवडणुकीत मते मागायला आलेल्या उमेदवारांना, राजकारण्यांना लोकांचे मन खरेच कळले आहे का, लोकांना त्यांच्या लोकप्रतिनिधीकडून काय हवे आहे, हे समजले आहे का, असा प्रश्न पडावा, अशी ही परिस्थिती. मुळात लोकांचा आता लोकप्रतिनिधींवर विश्वास तरी राहिला आहे का, याच प्रश्नाचे उत्तर लोकप्रतिनिधी आणि निवडणुकीत उतरणाऱ्या सगळ्यांनीच द्यायची गरज आहे. गेल्या निवडणुकीपर्यंत किमान विचारधारा या आधारावर तरी मत द्यायची सोय होती, यंदा तीही कुणी ठेवली नाही, अशी मतदारांची अवस्था आहे. म्हणजे, उपरोल्लेखित प्रतिक्रियांत भर टाकता येईल, अशी आणखी एक प्रतिक्रिया म्हणजे, ‘आम्हाला अमुक एका चिन्हाला मतदान करायचे आहे, पण ते चिन्हच इथे दिसत नाही. म्हणजे हे चिन्ह असलेला पक्ष लढतो आहे, की नाही?’ किमान आपल्या मतदारसंघातील उमेदवार कोण आहेत, ते कोणत्या युती वा आघाडीचे आहेत, अपक्ष कोण आहेत, इतर पक्षांकडून लढणारे कोण आहेत, याची माहिती मतदाराने घेतली पाहिजे, ही अपेक्षा रास्तच, पण गेल्या काळात निर्माण झालेल्या अनेक आघाड्या आणि युत्या यामुळे तो गोंधळात पडला आहे, हीसुद्धा वस्तुस्थितीच. बरे, समजा एखाद्या मतदाराला याबाबत अगदी चोख माहिती आहे, तरी त्याला पडणारा प्रश्न पुढीलप्रमाणे, ‘एखादा उमेदवार मी मत दिल्यानंतर, मी ज्या पक्षाच्या उमेदवाराविरोधात त्याला मत दिले, त्याच विरोधी उमेदवाराच्या पक्षात, गोटात जाऊन बसणार नाही, याची खात्री काय?’

आणखी वाचा-अशी झाली महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराची सांगता..!

सध्या परिस्थिती अशी आहे, की पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघांतील उमेदवारांची नुसती नावे सांगितली आणि त्यावरून ते नक्की कोणत्या पक्षाकडून आणि कोणत्या चिन्हावर लढताहेत, असे विचारले, तर फार थोड्या मतदारांना सगळ्या उमेदवारांचे पक्ष व चिन्ह अचूक सांगता येईल. शहरी मतदारांवर ही स्थिती आली आहे आणि आपण जी आश्वासने देतो आहोत, त्याचा आणि शहरात राहणाऱ्यांच्या दैनंदिन गरजांचा फारसा ताळमेळ लागत नाही, हे राजकारण्यांच्या लक्षात आले आहे का? निवडणूक म्हणजे लोकांनी, लोकांमधून, लोकांसाठी निवड करणे असे असेल, तर आजचे राजकारणी हे मुळात तुम्हा-आम्हा सामान्य लोकांसारखे, वैयक्तिक आयुष्यात आपल्यासारख्याच दैनंदिन प्रश्नांना सामोरे जाणारे राहिले आहेत का, हाच प्रश्न आहे आणि म्हणूनच निवड करणे अवघड होऊन बसले आहे. यावर आता कुणी म्हणेल, की मग कशाला करायचे मतदान? त्याचे उत्तर असे, की लोकांतून निवडून आलेला किंवा निवडून यायची इच्छा असलेला जेव्हा लोककर्तव्याची भावना विसरतो, तेव्हा त्याची आठवण करून द्यायला, लोकांना त्यांचे लोककर्तव्य म्हणजे मतकर्तव्य पार पाडणे गरजेचे ठरते.

siddharth.kelkar@expressindia.com

Story img Loader