लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी: केंद्र सरकारच्या बाल स्वास्थ मिशन कार्यक्रमाअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांसह शहरातील अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांच्या मोफत आरोग्य तपासणीत विविध आजारांनी विद्यार्थ्यांना ग्रासल्याचे समोर आले. २७० शाळेतील एक लाख ५० हजार ७५६ विद्यार्थ्यांची तपासणी केली. त्यापैकी चार हजार २३५ विद्यार्थ्यांना विविध आजार तर २३१ विद्यार्थ्यांना ऍपेडिंक्‍स, ह्दयरोग, हार्निया, किडनी, डोळ्यांचे आजार, कान, नाक, घशासह विविध गंभीर आजार असल्याचे समोर आले.

पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक अशा १२८ शाळा आहेत. या शाळांमध्ये सुमारे ४८ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यासह शहरातील १४२ अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांची केंद्र सरकारच्या बाल स्वास्थ मिशन कार्यक्रमा अंतर्गत एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या एका वर्षांच्या कालावधीत मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. मुलांचे डोळे, ह्‌दय, पोट, कान, नाक, घसा यासारख्या विविध तपासण्या करण्यात आल्या.

आणखी वाचा- पुणे: भाजप नेत्यांना वेळ मिळेना आणि गदिमा नाट्यगृहाचा पडदा उघडेना!

यामध्ये चार हजार २३५ विद्यार्थ्यांना विविध समस्या असल्याचे तपासणीत आढळून आले.  ऍपेडिंक्‍स २४, ओटासंदर्भात शस्त्रक्रिया १३, दंतरोग ७१, हृदयरोग ११, इएनटी २०, हार्निया दहा, किडनी दोन, ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया १६, मोतीबिंदू १२ आणि इतर ५१ अशा एकूण २३१ विद्यार्थ्यांना विविध गंभीर आजार असल्याचे समोर आले. या विद्यार्थ्यांवर शहरातील नामांकित मल्टी स्पेशालिटी रूग्णालयात केंद्र सरकारच्या बाल स्वास्थ मिशन कार्यक्रमा अंतर्गत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा भविष्यातील धोका टळला असून सर्व मुले सध्या व्यवस्थित आहेत.

विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आरोग्याची माहिती संग्रहित करण्यात आली. आगामी शैक्षणिक वर्षांपासून वर्षांतून दोनदा विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. -संदीप खोत, उपायुक्त शिक्षण विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: During school life students facing serious diseases pune print news ggy 03 mrj
Show comments