पदवी किंवा पदव्युत्तर पदवी घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष काम करताना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे सर्वच क्षेत्रांत व्यवस्थापन क्षेत्रातील वर्तमान बदल टिपून त्यानुसार काम करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. या पाश्र्वभूमीवर गणेश वाटवे यांनी सर्वशिक्षण ई-लर्निग या फर्मच्या माध्यमातून अॅजाइल मेथोडॉलॉजी आणि पीएमपी सर्टिफिकेशन प्रशिक्षण देण्याचा व्यवसाय सुरू केला. पुणेच नव्हेतर देशभरातील विविध शहरांसह अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आदी देशांमधील प्रकल्प व्यवस्थापकांकडून त्यांना मागणी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गणेश वाटवे यांनी चौदा वर्षे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम केले आहे. प्रकल्प व्यवस्थापक म्हणून विविध कंपन्यांमध्ये काम करण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यांनी २००७ मध्ये पीएमपी सर्टिफिकेशन केले आहे. त्याचा फायदा प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम करताना त्यांना झाला. त्यामुळे नोकरी करत असतानाच सर्टिफिकेशन प्रशिक्षणाचे वर्ग सुरू करण्याची कल्पना त्यांना सुचली. तसेच गणेश यांच्या मातोश्री शिक्षिका होत्या आणि पत्नीदेखील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे घरातील शिक्षकी पेशाचा वारसा पुढे नेण्याचे त्यांनी ठरविले आणि जानेवारी २०१४ मध्ये नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू केला. सर्वशिक्षण ई- लर्निगची प्रोप्रायटरी फर्म म्हणून नोंदणी आहे.
सुरुवातीला अॅनिमेशनमधून शैक्षणिक चित्रफिती, टय़ुटोरियल्स तयार करणे आणि त्यासोबतच सर्टिफिकेशनचे प्रशिक्षण देणे त्यांनी सुरू केले. मुलगादेखील कलावंत असल्याने त्यालाही त्याचा फायदा झाला. अॅनिमेशनच्या कामाची दखल घेऊन सर्वशिक्षणला आंतरराष्ट्रीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. २०१४ मध्ये आर्यलडमधील डबलीनमध्ये वर्ल्ड्स लार्जेस्ट टेक्नॉलॉजी समिटमध्ये वाटवे यांना बोलावणे आले होते. याच वर्षी एशियाज लार्जेस्ट एज्युकेशन एक्सलन्स पारितोषिकानेदेखील फर्मला गौरविण्यात आले आहे. अॅनिमेशनच्या कामात समाधान मिळत होते. परंतु, व्यवसायाच्या दृष्टीने अॅनिमेशनमध्ये अधिक वाव नसल्याचे लक्षात आल्यानंतर वर्षभरातच अॅनिमेशनचे काम थांबवून सर्टिफिकेशन प्रशिक्षण देण्याकडे त्यांनी पूर्ण लक्ष केंद्रित केले. कामाला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला स्वत:चे कार्यालय नव्हते. त्यामुळे एमसीए, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांबरोबरच सर्टिफिकेशन करण्यासाठी येणाऱ्यांना प्रशिक्षण कुठे द्यायचे हा प्रश्न होता. आठवडय़ाचे शेवटचे दोन दिवस माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना सुट्टी असते. त्यामुळे ओळखीतून जागा मिळवून शनिवार – रविवार प्रशिक्षण वर्ग व्हायचे. २०१५ मध्ये टिळक रस्त्यावर भाडेतत्त्वावर कार्यालय घेऊन वर्ग सुरू केले.
सर्टिफिकेशन म्हणजे एखाद्या क्षेत्रात माहीर असल्याची ग्वाही. प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूटचे (पीएमआय) प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल (पीएमपी) आणि स्क्रम-स्टडीचे स्क्रम-मास्टर अशी दोन आंतरराष्ट्रीय सर्टिफिकेशन आहेत. याबरोबरच अॅजाइल नावाच्या प्रकल्प व्यवस्थापन मेथोडॉलॉजीचे देखील प्रशिक्षण सर्व शिक्षणकडून दिले जाते. ही सर्व अमेरिकन सर्टिफायइड मॉडय़ुल आहेत. व्यवस्थापन क्षेत्रातील सातत्याने बदलणाऱ्या गरजांचा कशा पद्धतीने अवलंब करायचा याचे प्रशिक्षण सर्वशिक्षण ई-लर्निगकडून दिले जाते. सर्टिफिकेशनच्या इतर प्रशिक्षण इन्स्टिटय़ूटमध्ये एकदा प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रशिक्षणार्थी आणि इन्स्टिटय़ूटचा संबंध संपतो. मात्र, सर्वशिक्षण ई-लर्निग फर्ममधून प्रशिक्षण घेऊन गेलेल्या प्रशिक्षणार्थीना काही समस्या आल्यास संबंधितांना पुन्हा मोफत मार्गदर्शन केले जाते, असे गणेश सांगतात.
सर्व शिक्षणचे कामकाज गणेश स्वत: पाहतात. गेल्या चार महिन्यांपासून गणेश यांचे मित्र अजय गिरमे व्यवसाय विकास व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. प्रत्यक्ष वर्ग घेऊन आणि ऑनलाइनच्या माध्यमातून जागतिक स्तरावर प्रशिक्षणवर्ग चालविले जातात. सर्वशिक्षण फर्मला कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, जर्मनी, सिंगापूर येथूनही विद्यार्थी आणि प्रकल्प व्यवस्थापकांची प्रशिक्षणासाठी मागणी असते. परदेशातील आणि मुंबई, बेंगळुरू, चेन्नई अशा विविध शहरांमधील प्रशिक्षणार्थीना लाइव्ह प्रशिक्षण दिले जाते. मार्च २०१७ मध्ये गणेश यांच्या कामाची दखल घेऊन बांग्लादेशमधील डॉट नेट टेक्नॉलॉजी या संस्थेने विद्यार्थ्यांंना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांना बोलावले होते. लष्करामधील अनेक अधिकाऱ्यांनीदेखील त्यांच्याकडे व्यवस्थापन शास्त्राचे प्रशिक्षण घेतले आहे. पदवी घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष काम करताना प्राप्त पदवीचा फायदा होतोच असे नाही. त्यामुळे गणेश यांनी सामाजिक भान जपत शिवाजीनगर पीईएस मॉडर्न महाविद्यालयातील एमबीए आणि वाडिया व्यवस्थापन विभागाशी सामंजस्य करार केला आहे. या दोन्ही महाविद्यालयात सिक्स सिग्मा आणि स्क्रम सर्टिफिकेशनचे प्रशिक्षण दिले जाते. भारती विद्यापीठासाठी पीजीडीएम अभ्यासक्रमासाठी एक अभ्यासक्रम देखील गणेश यांनी करून दिला आहे.
हे सर्टिफिकेशन प्रकल्प व्यवस्थापकांसाठी आवश्यक असते. मोठय़ा माहिती तंत्रज्ञान कंपन्यामध्ये सर्टिफिकेशन असल्याशिवाय प्रकल्पावर काम करू दिले जात नाही. कारण आपला प्रकल्प वेळेत पूर्ण होईल याची शाश्वती मिळण्यासाठी हे सर्टिफिकेशन असणे आवश्यक आहे. व्यवस्थापन शास्त्रात सातत्याने बदल होत असल्याने दर तीन वर्षांनी सर्टिफिकेशनच्या अभ्यासक्रमात काळानुरूप बदल केले जातात. तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतरही सर्टिफिकेशन पुढे सुरू ठेवता येतात. मात्र, या तीन वर्षांत तुम्ही संबंधित क्षेत्राशी निगडित काय काम केले, त्या प्रकल्पाचा अनुभव ग्राह्य़ धरूनच ती पुढे विस्तारीत करता येतात, असे गणेश सांगतात.
prathamesh.godbole@expressindia.com