पुणे : कारागृहातील बंदीजनांना व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, विज्ञान विषयातील प्रसिद्ध पुस्तके संगणकावर पीडीएफ स्वरुपात वाचनासाठी उपलब्ध व्हावीत, या उद्देशातून येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये ई-लायब्ररीची सुविधा सुरू करण्यात आली आहे. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एम. के. महाजन यांच्या हस्ते या लायब्ररीचे उद्घाटन करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कारागृहातील बंदीजनांसाठी ई-लायब्ररी हा उपक्रम अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह आणि सुधारसेवा) अमिताभ गुप्ता आणि विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या संकल्पनेतून तसेच पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. या ई-लायब्ररीमध्ये विविध पुस्तके पीडीएफ स्वरुपात संगणकावर वाचनासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. या उपक्रमामुळे बंदीजनांमध्ये सकारात्मक भावना वृद्धिंगत होण्यास निश्चितच मदत होणार आहे, असे कारागृहाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

हेही वाचा…मोठी बातमी : एमपीएससीच्या परीक्षा लांबणीवर

गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ, उपअधीक्षक डॉ. भाईदास ढोले, पी. पी. कदम, आर. ई गायकवाड, एम. एच. जगताप, वरिष्ठ तुरुंग अधिकारी आनंदा कांदे या वेळी उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: E library facility launched at yerwada central jail pune for inmate education and development pune print news vvk 10 psg